-
ऋजुता लुकतुके
नुकताच बुद्धिबळातील जगज्जेता ठरलेला भारताचा डी गुकेश (D Gukesh) विजयानंतर आता मायदेशी परतला आहे. आणि चेन्नईत आल्यावर जवळच्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन गुकेश (D Gukesh) चक्क बंजी जंपिंगसाठी रवाना झाला. जगज्जेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने हा साहसी खेळ निवडला. बुद्धिबळाच्या पटावरही आव्हानात्मक आणि साहसी चाली रचण्यासाठी गुकेश (D Gukesh) प्रसिद्ध आहे. आणि आताही त्याने साहसी खेळालाच पसंती दिली.
बंजी जंपिंग (Bungee jumping) नंतर आपला व्हिडिओ गुकेशने स्वत:च ट्विटरवर शेअर केला आहे. ‘मी करून दाखवलं,’ असा मथळा त्याने या व्हिडिओला दिला आहे.
I did it! pic.twitter.com/FUBpo5m82N
— Gukesh D (@DGukesh) December 16, 2024
(हेही वाचा – MP News : भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांची आता काही खैर नाही; थेट FIR दाखल होणार)
गुकेशसाठी हे वर्षं कमालीचं यशदायी ठरलं आहे. टाटा स्टील मास्टर्स (Tata Steel Masters) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावून गुकेशने वर्षाची चांगली सुरुवात केली. आणि त्यानंतर बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देतानाही त्याने मोलाची कामगिरी बजावली होती. ऑलिम्पियाडच्या पाठोपाठच गुकेशने (D Gukesh) कँडिडेट स्पर्धेचं विजेतेपद पटाकवून जगज्जेत्याचा आव्हानवीर होण्याचा मान पटकावला. १८ व्या वर्षीच तो आव्हानवीर ठरला.
आणि सिंगापूरमध्ये झालेल्या जगज्जेतेपदाच्या लढतीत डिंग लिरेनचा ७.५ विरुद्ध ६.५ असा पराभव करत त्याने जगज्जेतेपदही पटकावलं आहे. १८ वर्षं आणि १६५ दिवसांचा गुकेश जगातील वयाने सगळ्यात लहान जगज्जेत्ता ठरला आहे. यापूर्वी भारताच्या विश्वनाथन आनंदने विक्रमी ५ वेळा जगज्जेतेपद जिंकलं आहे. त्यानंतर गुकेश अशी कामगिरी करणारा फक्त दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. अंतिम लढतीसाठी आनंदनेच गुकेशला मार्गदर्शन केलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community