Shubman Gill : सचिन, विराटनंतर शुभमन गिलही झळकणार एमआरएफच्या जाहिरातीत

शुभमन गिलला सातत्यपूर्ण कामगिरीमुळे एमआरएफचं प्रायोजकत्व मिळालं आहे.

52
Shubman Gill : सचिन, विराटनंतर शुभमन गिलही झळकणार एमआरएफच्या जाहिरातीत
Shubman Gill : सचिन, विराटनंतर शुभमन गिलही झळकणार एमआरएफच्या जाहिरातीत
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय क्रिकेटमधील सध्याचा क्रमवारीतील अव्वल फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) ताफ्यात आणखी एक ब्रँड जमा झाला आहे. चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) उपान्त्य फेरीच्या सामन्यात त्याच्या बॅटवर एमआरएफचा (MRF) स्टिकर काही जणांनी पाहिला असेल. या नवीन कराराची बोलणी पूर्ण झाल्यानंतर हा बदल झाला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर, विराट कोहलीनंतर आता शुभमन गिलही (Shubman Gill) एमआरएफचा (MRF) लोगो वापरताना दिसणार आहे. यापूर्वी शुभमन १९ वर्षांखालील संघात असल्यापासून तो सियाट टायर्सचा ब्रँड अँबेसिडर होता.

२५ वर्षांच्या शुभमनचा ब्रँडचा ताफा आता विस्तारत चालला आहे. एमआरएफ (MRF) बरोबरच नाईकी, मर्सिडिझ, डिऑर, कोकाकोला, बिट्स बाय ड्री, टाटा कॅपिटल्स, बजाज अलायन्स तसंच मायइलेव्हन सर्कल या ब्रँडची जाहिरात तो सध्या करत आहे. यापैकी बिट्स हे ॲपल कंपनीचं उत्पादन आहे. त्यांनी भारतात करारबद्ध केलेला हा पहिला ब्रँड अँबेसिडर आहे. भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार झाल्यानंतर शुभमन हा ब्रँड जाहिरात क्षेत्रात मोठा झाला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Weather : उन्हाचा कहर वाढला ! तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर)

गेल्यावर्षी श्रींलका दौऱ्यात त्याच्यावर पहिल्यांदा उपकर्णधार म्हणून विश्वास टाकण्यात आला. आता चॅम्पियन्स करंडकातही तो एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे. शिवाय रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच निवृत्त होण्याची शक्यता असल्यामुळे भावी कर्णधार म्हणूनही शुभमनकडे (Shubman Gill) पाहिलं जात आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुभमन (Shubman Gill) सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या. आणि आता चॅम्पियन्स करंडकातही (Champions Trophy) त्याने एक शतक झळकावलं आहे. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने विराटबरोबर महत्त्वपूर्ण भागिदारी केली. विराट आणि सचिनसह ब्रायन लारा, स्टिव्ह वॉ, एबी डिव्हिलिअर्स आणि शिखर धवन यांनी एमआरएफचे (MRF) लोगो बॅटवर वापरले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.