- ऋजुता लुकतुके
आयपीएल २०२५ हंगामाच्या मेगा लिलावाची (IPL Mega Auction) तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण पडद्यामागे संघ मालकांच्या बऱ्याच घडामोडी सुरू असल्याचं दिसतंय. कुणाला संघात कायम ठेवायचं, कुणाला वगळायचं यावर सध्या चर्चा सुरू आहेत. अशावेळी मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक बातमी समोर येत आहे. आयपीएलच्या लिलावाआधी असा दावा केला जात आहे की, केवळ रोहित शर्माच नाही तर कर्णधार हार्दिक पांड्यालाही ताफ्यातून वगळण्याचा मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीचा विचार आहे.
गेल्यावर्षी आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने मुंबई संघाचं नेतृत्व केलं होतं. ऐनवेळी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हातून सोडून हार्दिकच्या हाती गेले. त्यानंतर रोहित आणि संघ व्यवस्थापन यांच्यातील संबंध बिघडल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता केवळ रोहितच नाही तर हार्दिक पांड्यालाही संघातून वगळले जाऊ शकते अशी बातमी आहे. त्यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम डेव्हिड यांनाही संघातून रिलीज केले जाण्याची शक्यता आहे. (IPL Mega Auction)
(हेही वाचा – IPL Mega Auction : रिंकू सिंगच्या एका विधानाची चर्चा, विराटबरोबर बंगळुरू संघात खेळणार?)
दुसरीकडे, संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्याकडे मुंबई फ्रँचाईजीचा कल दिसत आहे. जसप्रीत बुमराह संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज राहू शकतो. त्यांच्याशिवाय, मुंबई इंडियन्स इशान किशन आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याचा दावा करत आहे. दरम्यान, मुंबई आकाश मधवाल आणि निहाल वढेरा यांना राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरू शकते.
हे खेळाडू कायम ठेवता येतील : सूर्यकुमार यादव (संभाव्य कर्णधार), जसप्रीत बुमराह, इशान किशन, तिलक वर्मा
हे खेळाडू रिलीज केले जाऊ शकतात : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड
राईट टू मॅच (RTM कार्ड) : आकाश मधवाल, निहाल वढेरा
अर्थात, सूर्यकुमारला संघात कायम ठेवण्यासाठी संघाला खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. कारण, सध्या भारताच्या टी-२० संघातली तो चलनी नाणं आहे. (IPL Mega Auction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community