- ऋजुता लुकतुके
मुंबई रणजी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आपल्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल बाद दिला गेला. पण, चहापानाची सुटी असताना आसाम संघाने त्यांच्याकडे असलेला अधिकार आणि नियम वापरून अजिंक्यला परतही बोलवलं. (Ajinkya Rahane)
मुंबईत बीकेसी मैदानावर हा सामना सुरू आहे. आणि पहिल्याच दिवशी मुंबईची फलंदाजी सुरू असताना हा प्रसंग घडला. संघाची अवस्था ४ बाद १०२ असताना अजिंक्य (Ajinkya Rahane) आणि शिवम दुबे ही जोडी मैदानात होती. चहापाना आधीच्या शेवटच्या चेंडूवर अजिंक्यने एक चेंडू मिड-ऑनला तटवला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेबरोबर समन्वयाचा अभाव असल्यामुळे अजिंक्य अर्ध्यातच माघारी परतला. पण, ते करताना त्याने यष्ट्या आपल्या बॅटने झाकल्या होत्या. आणि दानिश दासने चेंडू परतवल्यावर तो अजिंक्यच्या बॅटला लागला. (Ajinkya Rahane)
आसामच्या संघाने याविरोधात अपील केलं. आणि मैदानावरील पंचांनी क्षेत्ररक्षणासाठी अडथळा आणला म्हणून अजिंक्यला (Ajinkya Rahane) बादही दिलं. पण, यानंतर झालं ते विचित्र होतं. चहापान सुरू असताना अचानक आसाम संघाने हे अपीलच मागे घेतलं. आणि मैदानावरील पंचांनीही हे मान्य केलं. फलंदाज बाद झाल्यानंतर पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघाने अपील मागे घेतलं तर खेळाडू पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. तसा क्रिकेटमधील नियम आहे. (Ajinkya Rahane)
(हेही वाचा – Asian Badminton Championship : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुषांचा जपानकडून पराभव)
MORE TWIST IN THE TALE: Assam has withdrawn the appeal, and Ajinkya Rahane is back to the crease. Crazy scenes at BKC Ground. @sportstarweb https://t.co/GS0JX5gB56
— Shayan Acharya (@ShayanAcharya) February 16, 2024
अजिंक्यला (Ajinkya Rahane) हे जीवदान मिळालं खरं. पण, तो त्याचा फारसा फायदा उचलू शकला नाही. ६९ चेंडूंत २२ धावा करून तो बाद झाला. आणि त्याचं यंदाच्या हंगामातील अपयश सुरुच राहिलं. अख्ख्या हंगामात त्याने फक्त एक अर्धशतक ठोकलं आहे. आसाम विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी आसामला ८४ धावांत सर्वबाद केल्यावर मुंबईची सुरुवातही अडखळती झाली होती. पहिले ६ फलंदाज दीडशेच्या आतच बाद झाले. पण, शिवम दुबेनं शतक झळकावत मुंबईला दोनशेचा टप्पा गाठून दिला. आणि १३४ धावांची पहिल्या डावातील आघाडीही मिळवून दिली. मुंबई रणजी संघाने उपउपांत्य फेरीत यापूर्वीच प्रवेश केला आहे. (Ajinkya Rahane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community