चार वेळा आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि २००८ चे विजेते राजस्थान रॉयल्सचा सामना आज चेन्नईच्या एम.ऐ. चिदंबरम स्टेडियमवर होणार असून उभय संघ ११ महिन्यानंतर एकमेकांसमोर दिसणार आहे. दोन्ही संघ तुफान खेळत असून सामना रंजक होईल.
दोन्ही संघाची ताकद
भक्कम अशी फलंदाजी दोन्हीकडे आहे. मागच्या सामन्यात दोघांना विजय प्राप्त झाला आहे. मोईन अली, ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंग धोनी हे चेन्नई संघातील अव्वल खेळाडू आहेत. गायकवाड फलंदाजीच्या चांगल्या फ्लोमध्ये आहे. त्याने तीन सामन्यात १८९ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे राजस्थानच्या जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर संघाच्या वरच्या क्रमात चमकदार कामगिरी करत आहेत.
(हेही वाचा अजित पवार घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट; चर्चेला उधाण, नेमके कारण काय?)
रहाणेच्या कामगिरीकडे लक्ष
अंजिक्य रहाणेने मुंबई विरुद्धच्या सामन्यात स्फोटक खेळी करून चेन्नईला आणखीन एक फलंदाजीसाठी पर्याय दिलेला आहे. तसेच त्याने भारतीय संघाचे दारही ठोठावले आहे. येत्या जूनमध्ये जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असणार आहे. अजिंक्य रहाणे भारताच्या कसोटी संघातून जानेवारी २०२२ पासून बाहेर आहे. ८२ कसोटी सामन्यात ४९३१ धावा करत १२ शतकं व २५ अर्धशतकं झळकावली आहेत.
Join Our WhatsApp Community