Ajinkya Rahane vs Yashasvi : अजिंक्य रहाणेनं यशस्वीला मैदानाबाहेर घालवलं तो क्षण होतोय व्हायरल

Ajinkya Rahane vs Yashasvi : यशस्वीने अलीकडेच मुंबई रणजी संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

75
Ajinkya Rahane vs Yashasvi : अजिंक्य रहाणेनं यशस्वीला मैदानाबाहेर घालवलं तो क्षण होतोय व्हायरल
  • ऋजुता लुकतुके

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने एक धक्कादायक निर्णय घेताना मुंबई सोडून गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे त्याला संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. पण, त्याचबोरोबर यशस्वीने आणखी काही कारणांनी मुंबई संघ नाही ना सोडलेला अशी चर्चाही सुरू झाली आहे. एक शक्यता समोर आली ती, २०२२ च्या दुलिप करंडक सामन्यात अजिंक्य रहाणेनं शिस्तभंगाची कारवाई करत यशस्वीला मैदानाबाहेर घालवलं होतं तो क्षण. दुलिप करंडक विभागीय स्पर्धा असली तरी रहाणे हाच मुंबई संघाचाही कर्णधार आहे. त्यामुळे या प्रसंगामुळे यशस्वी चिडला असावा अशीही चर्चा सुरू झाली. (Ajinkya Rahane vs Yashasvi)

त्यानंतर रहाणेनं यशस्वीला मैदानाबाहेर घालवलं तो क्षणही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २०२२ साली पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभाग असा दुलिप करंडक सामना तेव्हा सुरू होता. पश्चिम विभागाचा कर्णधार होता अजिंक्य रहाणे. पश्चिम विभागाची गोलंदाजी सुरू असताना यशस्वी फॉरवर्ड शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करत होता. वारंवार अपील आणि फलंदाजाला स्लेजिंग केल्याबद्दल पंचांनी यशस्वीला किमान तीनदा इशारा दिला. सामन्यातील ५० व्या षटकांत तर फलंदाज रवी तेजा आणि यशस्वी यांच्यात मैदानावरच बाचाबाची झाली. त्यावेळी पंच आणि रहाणे यांना दोन्ही खेळाडूंमध्ये मध्यस्थी करावी लागली. (Ajinkya Rahane vs Yashasvi)

(हेही वाचा – IPL 2025, MI vs LSG : दिग्वेश सिंगचं बळी मिळवल्यानंतरचं सेलिब्रेशन पुन्हा चर्चेत)

या प्रसंगानंतरही यशस्वीचा मैदानातील आक्रमकपणा थांबला नाही. अखेर रहाणेला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि त्याने यशस्वीला मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं. तेव्हाही यशस्वी नाखुशच होता आणि काहीतरी रागाने पुटपुटत तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर १४ षटकांनी ६४ व्या षटकांत रहाणेनं यशस्वीला पुन्हा मैदानात बोलवलं. यशस्वीने सध्या मुंबई संघ सोडण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितलं आहे. पण, त्याचवेळी मुंबई संघाविषयीचे आपले ऋणही मान्य केले आहेत. (Ajinkya Rahane vs Yashasvi)

‘मुंबई क्रिकेटने मला सर्व काही दिलं आहे. त्यामुळे मी सदैव मुंबई क्रिकेटच्या ऋणात राहीन. पण, कारकीर्दीच्या या टप्पयावर मला गोव्याकडून नवीन संधी मिळणार आहे आणि ती मला घ्यायची आहे,’ असं जयस्वाल म्हणाला होता. गोवा रणजी संघाचा अलीकडेच एलीट गटात समावेश झाला आहे. त्यामुळे ते देशभरातील काही अनुभवी खेळाडूंना करारबद्ध करण्याच्या प्रयत्नांत आहेत. (Ajinkya Rahane vs Yashasvi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.