Ajit Agarkar on Virat Kohli : निवड समिती प्रमुख अजित आगरकर विराटच्या तंदुरुस्तीवर काय म्हणाला?

Ajit Agarkar on Virat Kohli : ‘विराटने तंदुरुस्तीचा मापदंड प्रस्थापित केला’

205
Ajit Agarkar on Virat Kohli : निवड समिती प्रमुख अजित आगरकर विराटच्या तंदुरुस्तीवर काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा विक्रमांच्या बाबतीत अनेक फलंदाजांच्या बाबतीत खूप पुढे आहे. त्याच्या बाबतीत आणखी एक गोष्ट वेगळी आहे. ३५ व्या वर्षीही तो इतका तंदुरुस्त आहे की, पुढील एकदिवसीय विश्वचषक तो खेळू शकेल असा सगळ्यांना विश्वास वाटतो. त्याची तंदुरुस्ती धावा पळण्यात आणि झेल टिपण्यातही दिसून येते. ३५ वर्षीय विराट कोहलीच्या तंदुरुस्तीचं कौतुक आता निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही केलं आहे. आणि विराटच्या तंदुरुस्तीचा सकारात्मक परिणाम भारतीय संघावर होत असल्याचंही म्हटलं आहे. (Ajit Agarkar on Virat Kohli)

‘१०-१५ वर्षं विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International cricket) खेळतोय आणि या कालावधीत तो होता त्यापेक्षा जास्त तंदुरुस्त झाला आहे. त्याने इतरांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे. आणि संघातील तरुणांनी त्याच्याकडून प्रेरणा घेऊन तरुण खेळाडूही आता तंदुरुस्तीवर मेहनत घेताना दिसतात. भारतीय क्रिकेट संघात तंदुरुस्तीची बीजं पेरण्यात विराटचा मोठा वाटा आहे,’ असं आगरकर यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवलं आहे. (Ajit Agarkar on Virat Kohli)

(हेही वाचा – IPL 2024 GT vs RR : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड का झाला?)

आगरकरांनी ‘ही’ आशा केली व्यक्त 

आताच्या आयपीएल (IPL) हंगामात तो २ महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे. पण, फलंदाजीतील त्याचं सातत्य वादातीत आहे. आतापर्यंत ५ सामन्यांत ३१४ धावा करत त्याने ऑरेंज कॅपही पटकावली आहे. शिवाय आयपीएलमध्ये विक्रमी आठवं शतकही त्याने अलीकडेच झळकावलंय. (Ajit Agarkar on Virat Kohli)

राष्ट्रीय स्तरावर चांगले खेळाडू पुरवण्यातील आयपीएलचं योगदानही अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी अधोरेखित केलं. ‘आयपीएलमध्ये (IPL) खेळाडूंना चांगली संधी मिळते आणि प्रत्येक हंगामात २-३ चांगले खेळाडू समोर येतात. हे युवा खेळाडू एरवी फारसे कुणाला माहीत नसतात. पण, आयपीएलमध्ये चमकतात आणि पुढे संधी मिळाल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करतात. आयपीएल ही अशा खेळाडूंची खाण आहे,’ असं मत आगरकर यांनी व्यक्त केलं. जो संघ स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात कामगिरी उंचावेल आणि चांगला जमून येईल, तो आयपीएलमध्ये नक्की विजयी होईल, अशी आशाही आगरकर यांनी व्यक्त केली. (Ajit Agarkar on Virat Kohli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.