ऋजुता लुकतुके
रांची कसोटीचा पहिला दिवस इंग्लिश संघाच्या (English teams) नावावर लिहिला जाईल. (Aksh Deep 3 Wicket Haul) कारण, संथ खेळपट्टीवर ३०० च्या वर धावा करून पाहुण्यांनी चांगली सुरुवात केली आहे. जो रुटच्या शतकामुळे इंग्लिश संघाला (English teams) हे शक्य झालं. नाहीतर पहिल्याच सत्रात त्यांची अवस्था ५ बाद जेमतेम १०० धावा अशी झाली होती. आणि यातले ३ बळी मिळवले होते ते कसोटीत पदार्पण करणाऱ्या नवख्या आकाश दीपने (Aksh Deep). दिवसभरात त्याने १७ षटकांत ६८ धावा देत ३ बळी मिळवले. आणि झॅक क्रॉलीचा (Zack Crowley) एका नोबॉलवर त्याने त्रिफळा उडवला. नाहीतर हा बळीही त्याच्या नावावर जमा झाला असता. (Aksh Deep 3 Wicket Haul)
त्यामुळे भारतासाठी तरी पहिली दिवस आकाश दीपनेच (Aksh Deep) गाजवला (Aksh Deep 3 Wicket Haul). सामन्याच्या दहाव्या षटकात त्याने डावखुरा सलामीवीर बेन डकेटला यष्टीरक्षक ध्रुव जुरेलकडे झेल द्यायला भाग पाडलं. गुड लेंग्थवर पडलेला हा चेंडू थोडासाच आत आला. आणि डकेटच्या बॅटची कडा घेऊन जुरेलच्या हातात विसावला. (Aksh Deep 3 Wicket) Haul
(हेही वाचा- जगभरात भारतीय सर्वाधिक संख्येने Instagram वर रेंगाळतात; काय म्हणतो सर्वे? )
यानंतर आणखी दोन चेंडू गेल्यावर त्याने एका वेगवान चेंडूवर ऑली पोपला चकवलं. पोप क्रीझमध्येच अडखळला. आणि यष्ट्यांवर जाणाऱ्या चेंडूला पायाने अडवल्यामुळे पायचीतचा शिकार झाला. एकाच षटकात दोन बळी टिपल्यावर आकाशचा उत्साह आणखी वाढला. आणि त्याने पुढच्याच षटकांत झॅक क्रॉलीला पुन्हा एकदा चकवलं. आणि यावेळी चेंडू नोबॉलही नव्हता. चेंडू थेट यष्टीवर आदळला आणि बेल्स उडवून गेला. (Aksh Deep 3 Wicket Haul)
WWW 🤝 Akash Deep!
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/YANSwuNsG0
— BCCI (@BCCI) February 23, 2024
मागच्या काही वर्षांत आकाश दीप (Aksh Deep) हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा तेज गोलंदाज आहे. अगदी अलीकडे इंग्लंड लायन्स संघाविरुद्धही त्याने मालिकेत १३ बळी टिपले होते. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने (BCCI) त्याच्यावर एक व्हीडिओ बनवला होता. आणि यात आकाश त्याचा क्रिकेटर होण्याचा प्रवास सांगत होता. (Aksh Deep 3 Wicket Haul)
बिहारच्या सासाराममध्ये त्याचे वडील शालेय शिक्षक होते. आणि घरात कुणाचाही खेळांशी संबंध नव्हता. त्यामुळे आकाशची क्रिकेटची आवड घरी वडिलांनाच मान्य नव्हती. त्यांनी मुलाला अभ्यास करण्याचा सल्ला दिला. पण, आकाश वडिलांपासून लपवून क्रिकेट खेळत राहिला. आणि जेव्हा तसं खेळणं अशक्य झालं, तेव्हा तो बिहार सोडून पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरला आला आणि तिथे काकांबरोबर राहू लागला. हा व्हीडिओ तुम्ही खालील लिंकमध्ये पाहू शकता. (Aksh Deep 3 Wicket Haul)
(हेही वाचा- PM Narendra Modi : जगभरात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीच ‘भारी’ )
Words that inspire 🗣️ ft. Rahul Dravid
Dreams that come true 🥹
A debut vision like never seen before 🎥
Akash Deep – What a story 📝#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vSOSmgECfC
— BCCI (@BCCI) February 23, 2024
२०१० मध्ये आकाश फलंदाजीचं प्रशिक्षण घ्यायचं म्हणून प्रशिक्षण वर्गात दाखल झाला. पण, इतक्यात घरी वडील आणि मागोमाग मोठा भाऊही मरण पावला. आकाशला घरी परतावं लागलं. पण, क्रिकेटचं स्वप्न पाठ सोडत नव्हतं. म्हणून ३ वर्षांनी तो पुन्हा दुर्गापूरला आला. यावेळी त्याची उंची आणि चण लक्षात घेऊन त्याला बंगाल क्रिकेट असोसिएसनच्या एका शिबिरात गोलंदाजीकडे वळण्याचा सल्ला मिळाला. आणि तो २०१३ पासून तेंज गोलंदाजी करायला लागला. (Aksh Deep 3 Wicket Haul)
२०१९ मध्ये बंगालकडूनच त्याने रणजीत पदार्पण केलं. आणि तिथून त्याने वळून पाहिलेलं नाही.