-
ऋजुता लुकतुके
क्रिकेट सांघिक खेळ असला तरी यातही खेळाडू खेळाडूंमध्ये चढाओढ असतेच. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे सध्याचे संघ हे स्टार खेळाडूंनी भरलेले आहेत. त्यांच्यातील काही उपलढतींवर नजर टाकूया… (Ind vs SA)
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा ईडन गार्डन्सवर होणारा सामना हा स्पर्धेतला ३७ वा साखळी सामना आहे. आतापर्यंतचा या स्पर्धेतला दोन्ही संघांचा फॉर्म पाहता ही लढत चांगलीच लक्षवेधी ठरणार आहे. आफ्रिकन संघ जिंकला तर ते भारताला बाजूला सारुन गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर पोहोचतील आणि भारताने विजय मिळवला तर भारतीय संघ पहिला क्रमांक मजबूत करेल. (Ind vs SA)
खरंतर कागदावर तरी दोन्ही संघांमध्ये डावं-उजवं करणं शक्य होणार नाही. दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठे विजय मिळवलेत. एकाच वेळी त्यांचे ३-४ फलंदाज खोऱ्याने धावा करतायत आणि गोलंदाज लयबद्ध गोलंदाजी करून साथीने बळी टिपतायत. स्टार खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आहेत. उद्या दोन संघ मैदानात खेळतील तेव्हा खेळाडूंमध्येही चढाओढ असेल. अशा काही खेळाडूंमधील लढतींवर नजर टाकूया… (Ind vs SA)
१. विराट कोहली वि. मार्को जानसेन
विराट कोहली आणि मार्को जानसेन आंतरराष्ट्रीय सामन्यांत यापूर्वी आमने सामने आलेले नाहीत. पण, आयपीएलमध्ये दोनदा समोरासमोर खेळलेत. विश्वचषकात सध्या जानसेन १६ बळींसह आफ्रिकेचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे आणि प्रत्येक सामन्यात तो किमान २ तरी बळी टिपतो. रविवारी विराट कोहली त्याला कसा खेळून काढतो याची उत्सुकता सगळ्यांना असेल. (Ind vs SA)
दुसरीकडे, विराट कोहलीने ५ वेळा ५० पेक्षा धावा केल्या आहेत. यात एक शतक आहे. तर इतर तीन धावसंख्या या ८० धावांपेक्षा जास्त आहेत. (Ind vs SA)
२. रोहीत शर्मा वि. रबाडा
रोहीत भारताचा सलामीवीर फलंदाज तर रबाडा आफ्रिकेचा कसलेला नवा चेंडू हाताळणारा गोलंदाज. दोघं ११ एकदिवसीय सामन्यात आमने सामने आले आहेत आणि यात रबाडाने ४ वेळा रोहितला बाद केलंय. यंदाच्या स्पर्धेत रोहीत भन्नाट फॉर्ममध्ये आहे. ७ सामन्यांत त्याने ४०१ धावा केल्यात त्या ५७.५२ च्या सरासरीने आणि त्याचा स्ट्राईकरेट आहे ११९ धावांचा. तर रबाडा संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय. त्याने आतापर्यंत ११ बळी मिळवले आहेत. (Ind vs SA)
३. शुभमन गिल वि. गेराल्ड कोएटझी
शुभमन गिल आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. डेंग्यूच्या संसर्गामुळे स्पर्धेतील त्याची सुरुवात काहीशी धिमी झाली. सुरुवातीचे दोन सामने तो खेळूही शकला नाही. पण, नंतर मात्र त्याने आपली चुणूक दाखवून दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ट्रेडमार्क खेळी खेळताना ९२ धावा केल्या. (Ind vs SA)
तर कोएटझीही पूर्ण विश्वचषक खेळू शकला नाही. पण, खेळलेल्या ६ सामन्यांत त्याने १४ बळी टिपलेत आणि आफ्रिकेचा तो दुसरा यशस्वी गोलंदाज आहे. त्यामुळे शुभमन वि. कोएटझी ही लढतही महत्त्वाची आहे. (Ind vs SA)
(हेही वाचा – Diwali Festival 2023 : आधीच वेळेवर पगार नाही, बोनस नाही, त्यातच परे आणि मरेचा मेगाब्लॉक; दिवाळीच्या खरेदीवर सावट)
४. क्विंटन डी कॉक वि. जसप्रीत बुमरा
क्विंटन डी कॉक या स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. ७ सामन्यांत त्याच्या नावावर ५४५ धावा जमा आहेत. यात चार शतकंही आहेत. रोहित शर्माच्या एकाच विश्वचषक स्पर्धेत पाच शतकांच्या विक्रमापासून तो एक शतक दूर आहे. शिवाय स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचा मानस त्याने बोलून दाखवला आहे. डी कॉकचा एकदा जम बसला की, त्याला बाद करणं कठीण असतं. (Ind vs SA)
त्यामुळे ती जबाबदारी आघाडीच्या भारतीय गोलंदाजांना आणि खासकरून जसप्रीत बुमराला पार पाडावी लागणार आहे. कारण, बुमरा अचूक गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि डी कॉकला फटके खेळण्याची मुभा न देता जखडून ठेवलं तरंच त्याचा बळी टिपणं शक्य होणार आहे. शिवाय यापूर्वी बुमराने सातवेळा डी कॉकला बाद केलं आहे. (Ind vs SA)
५. कुलदीप यादव वि. हेन्री क्लासेन
हेनरीच क्लासेन आफ्रिकन संघाचा धडाकेबाज फलंदाज आहे. शेवटच्या षटकांत येऊन हाणामारी करण्यात तो पटाईत आहे. आतापर्यंत स्पर्धेत त्याने ३१५ धावा केल्या आहेत त्या १५३ धावांच्या स्ट्राईक रेटने. यात तळाला येऊन त्याने एक शतक आणि एक अर्धशतकही ठोकलं आहे. शिवाय फटकेबाजी करताना तो फिरकी गोलंदाजच निवडतो. (Ind vs SA)
दुसरीकडे कुलदीप यादव भारताचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज आहे. त्याने १० बळी टिपलेत. त्याचबरोबर त्याने षटकामागे फक्त ४ धावा दिल्या आहेत. त्यामुळे कुलदीप क्लासेन विरुद्ध यशस्वी ठरला तर शेवटच्या षटकांत संघाला बसणारा मार टळणार हे नक्की. (Ind vs SA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community