Aman Sehrawat Bronze : ५७ किलो वजनी गटात अमन सेहरावतला कांस्य

Aman Sehrawat Bronze : अमनने पदार्पणातच कांस्य जिंकण्याचा विक्रम केला आहे 

83
Aman Sehrawat Bronze : ५७ किलो वजनी गटात अमन सेहरावतला कांस्य
Aman Sehrawat Bronze : ५७ किलो वजनी गटात अमन सेहरावतला कांस्य
  • ऋजुता लुकतुके

हरयाणाच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने (Aman Sehrawat Bronze) पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात ५७ किलो गटांत कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. पदार्पणातच ऑलिम्पिक पदक जिंकणारा आणि वयाने सगळ्यात लहान असा  तो पहिला भारतीय मल्ल ठरला आहे. पोर्टोरिकोच्या डॅरियन क्रूझवर अमनने १३-५ असा दणदणीत विजय मिळवला. कुस्तीत २००८ पासून एकतरी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा भारताचा लौकिकही कायम राखला. निशा दहिया (Nisha Dahiya) आणि विनेश (Vinesh) यांच्या ऐनवेळी झालेल्या पराभवामुळे यंदा ऑलिम्पिक मोहीम धोक्यात आली होती.

(हेही वाचा- दादर रेल्वे स्टेशन पुन्हा हादरलं! Nandigram Express च्या शौचालयात सापडला गळफास लावलेला मृतदेह)

विशेष म्हणजे अमन सेहरावत भारताचा सगळ्यात लहान ऑलिम्पिक पदक विजेता ठरला आहे. गेल्या महिन्यात १६ जुलैला त्याने आपला २१ वा वाढदिवस साजरा केला. यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकून पी व्ही सिंधू (PV Sindhu) भारताची सगळ्यात लहान ऑलिम्पिक पदक विजेती होती. सिंधू तेव्हा २१ वर्ष १ महिना आणि १४ दिवसांची होती. (Aman Sehrawat Bronze)

 सेहरावतने जिंकलेलं हे भारताचं या ऑलिम्पिकमधील सहावं पदक आहे. त्यामुळे भारतीय पथक निदान टोकयो ऑलिम्पिकमधील कामगिरीच्या जवळ जाऊ शकलं. भारतीय संघाने आतापर्यंत या ऑलिम्पिकमध्ये १ रौप्य आणि ५ कांस्य पदकं जिंकली आहेत. अमन सेहरावतचे आई-वडील त्याच्या लहानपणीच गेले. त्यानंतर त्याच्या आजोबांनी त्याला वाढवलं. या पदकानंतर त्याने कुटुंबीयांचे ऋण मान्य केले. (Aman Sehrawat Bronze)

(हेही वाचा- Election Commission : मतदार ओळखपत्रात काही बदल करायचे आहेत? प्रशासनाने केले ‘हे’ आवाहन)

‘मी देशासाठी जिंकलेलं हे पहिलं पदक आहे. त्यामुळे मी ते जिंकायलाच हवं होतं. आता देशवासीयांना मला इतकंच सांगायचं आहे की, २०२८ मध्ये मी सुवर्ण जिंकेन,’ असं अमन पदक जिंकल्यानंतर म्हणाला. (Aman Sehrawat Bronze)

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अमनचं कौतुक केलं आहे. ‘कुस्तीने भारताला आणखी एक अभिमानाचा क्षण मिळवून दिला आहे. ५७ किलो वजनी गटात अमन सेहरावतने कांस्य जिंकलं आहे. त्याचं समर्पण आणि चिकाटी त्याच्या कामगिरीतून दिसून येते. अख्खा देश त्याचं हे यश साजरं करत आहे,’ असं पंतप्रधान मोदी यांनी संदेशात म्हटलं आहे. (Aman Sehrawat Bronze)

(हेही वाचा- CM Eknath Shinde: मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश )

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारने भारताला पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीत किमान एक पदक जिंकलं आहे. २०१२ मध्ये सुशीलचं रौप्य व योगेश्वर दत्तला कांस्य मिळालं होतं. २०१६ ला रिओमध्ये साक्षी मलिकने कांस्य जिंकलं. तर २०२० च्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये रवी दाहियाला रौप्य आणि बजरंग पुनियाला कांस्य मिळालं होतं. (Aman Sehrawat Bronze)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.