-
ऋजुता लुकतुके
५७ किलो गटात ऑलिम्पिक कांस्य जिंकलेला अमन सेहरावत उपांत्य फेरीतील सामन्यानंतर एका वेगळ्याच अडचणीत सापडला होता. एकतर उपांत्य सामन्यात झालेला पराभव आणि त्यातच गुरुवारी रात्री त्याचं वजनही ६१.६ किलो इतकं भरलं होतं. म्हणजे विनेश प्रमाणेच त्यालाही वजन कमी करण्याच्या दिव्यातून जायचं होतं. पण, सुदैवाने यावेळी अमन त्यात यशस्वी ठरला. पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करणं तुलनेनं सोपं जातं. (Aman Sehrawat Bronze)
कांस्य पदकाच्या सामन्यापूर्वी अमनने रात्रीत मेहनत घेऊन तब्बल ४.६ किलो वजन कमी केलं.
6⃣𝐭𝐡 𝐦𝐞𝐝𝐚𝐥 𝐟𝐨𝐫 🇮🇳
𝐀𝐦𝐚𝐧 𝐒𝐞𝐡𝐫𝐚𝐰𝐚𝐭 𝐥𝐞 𝐚𝐚𝐲𝐚 #𝐁𝐫𝐨𝐧𝐳𝐞🥉🥳The 21-year-old wrestler displayed a solid performance against Puerto Rico’s Darian Cruz and won the contest by 13-5 in Men’s 57kg Freestyle 💯
Aman brings home #TeamIndia’s 5th Bronze and… pic.twitter.com/fKohvCfFIj
— SAI Media (@Media_SAI) August 9, 2024
२१ वर्षीय अमन जपानी प्रतिस्पर्धी राय हिगुची विरुद्धचा सामना साडेसहा वाजता खेळला. यात त्याचा पराभव झाला. त्यानंतर लगेचच प्रशिक्षांना त्याचं वजन वाढल्याचं लक्षात आलं. मग वीरेंद्र दहिया आणि जगमंदर सिंग यांनी त्यावर काम सुरू केलं. सुरुवातीला अमनने उभ्या कुस्तीचाच सराव दीड तास केला. (Aman Sehrawat Bronze)
त्यानंतर एक तास अमनने गरम पाण्याची आंघोळ करून काही घाम गाळला. त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता अमन अख्खा एक तास न थांबता ट्रेडमिल करत होता. ३० मिनिटांच्या विश्रांतीनंतर अमनने सौना बाथचे प्रत्येकी पाच मिनिटांचे पाच सेट केले. त्यानंतरही अमनचं वजन ९०० ग्रॅम जास्त भरत होतं. (Aman Sehrawat Bronze)
(हेही वाचा- Brazil Plane Crash: ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू)
यानंतर तज्जांचा सल्ला घेण्यात आला. त्यानुसार, अमनने धावण्याचा व्यायाम सुरू केला. प्रत्येकी १५ मिनिटांची धावण्याची लहान लहान सत्र त्याने केली. हे सगळं करून झाल्यावर पहाटे साडेचार वाजता अमनचं वजन ५६.९ असं आटोक्यात आलं. अमन आणि त्याचा चमू अख्खी रात्र झोपला नाही. अमनला मधून मधून लिंबूपाणी आणि थोडी कॉफी दिली जात होती. मल्लाचं साडेचार किलो वजन कमी करणं ही एरवी नियमित प्रक्रिया आहे. पण, विनेश फोगाटच्या बाबतीत सगळे आडाखे चुकल्यामुळे यावेळी भारतीय पथकावर दडपण होतं. पण, सगळं अखेर सुरळीत पार पडलं. (Aman Sehrawat Bronze)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community