Aman Sehrawat : ऑलिम्पिक कांस्य विजेत्या अमन सेहरावतचं जोरदार स्वागत

Aman Sehrawat : ५७ किलो वजनी गटात अमनने कांस्य जिंकलं. 

150
Aman Sehrawat : ऑलिम्पिक कांस्य विजेत्या अमन सेहरावतचं जोरदार स्वागत
  • ऋजुता लुकतुके

५७ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलेला अमन सेहरावत (Aman Sehrawat) मंगळवारी नवी दिल्ली विमानतळावर पोहोचला. तिथून तो जिथे सराव करतो त्या छत्रसाल स्टेडिअमपर्यंत त्याची मिरवणूक काढण्यात आली. विमानतळावरच त्याच्या स्वागतासाठी लोक जमले होते. २१ व्या वर्षी आपल्या पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्येच अमनने कांस्य पदकाच्या लढतीत पोर्टोरिकोच्या डॅरियन क्रूझचा १३-५ असा पराभव करत कांस्य नावावर केलं.

मंगळवारी भारतीय हॉकी संघही नवी दिल्लीत पोहोचला. ‘मला खूप आनंद झालाय आणि विश्वासच बसत नाहीए की, मी ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे. खरंतर मला सुवर्ण जिंकायचं होतं. पण, कांस्य पदकातही मी खुश आहे,’ असं अमनने (Aman Sehrawat) एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

(हेही वाचा – Bangladesh Violence : हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पॅरिसमध्ये हजारो हिंदू उतरले रस्त्यावर)

ऑलिम्पिक पोडिअमवर पदक स्वीकारतानाचाही अनुभव अमनने (Aman Sehrawat) सांगितला. ‘पोडिअमवर उभा राहिलो तेव्हा जग क्षणभर थांबल्यासारखं झालं. शब्दांत त्याचं वर्णन करता येणार नाही. आता आजपासूनच मी लॉस एंजलीस ऑलिम्पिक आणि २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांची तयारी सुरू करणार आहे,’ असं अमनने सांगितलं.

भारतीय हॉकी संघाने कांस्य जिंकलं. त्याच रात्री अमनचा (Aman Sehrawat) कांस्य पदकाचा सामना होता आणि त्याने निराश केलं नाही. छत्रसाल स्टेडिअममध्ये लहानाचा मोठा झालेला अमन भारताचा सहावा पदक विजेता खेळाडू ठरला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाने १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांसह एकूण सहा पदकं जिंकली. पदक तालिकेत भारतीय संघ ७१ व्या स्थानावर राहिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.