मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे!

171

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या निवडणुकीत यंदा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले, त्यांना शिवसेनेच्या दोन्ही गटांचीही साथ मिळाली. त्यामुळे शेलार गटाचे अमोल काळे हे असोसिएशनच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आले आहेत. अमोल काळे हे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.

क्रीडा क्षेत्रात पवार-शेलारांची युती

भारताचे माजी क्रिकेटर संदीप पाटील हे मुंबई क्रिकेट ग्रुपचे उमेदवार म्हणून अध्यक्षपदासाठी रिंगणात होते. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात या निवडणुका जाहीर झाल्यापासून सुरुवातीला शरद पवार यांच्या गटाचा पाठिंबा संदीप पाटील यांना मिळेल अशी चर्चा होती. मात्र 10 ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पवार आणि शेलार गट एकत्र आलेले दिसले. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पवार-शेलार ग्रूपमध्ये शिवसेनेतून फुटलेल्या दोन्ही गटांशी नाते असलेल्या नेत्यांचा म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक यांचा समावेश आहे. त्यामुळे एरवी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले नेते एमसीएच्या निवडणुकीत मात्र एकमेकांना साथ देताना दिसले. 20 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार होती, 11 ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली करण्यात आलो, 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेण्याची तारीख होती. याच दिवशी अमोल काळे बिनविरोध निडवून आले.

(हेही वाचा …तर तिसरे महायुद्ध अटळ, युक्रेनचा नाटोमध्ये समावेश करण्यावरुन रशियाचा इशारा)

कोण आहेत अमोल काळे?

2016 साली आशिष शेलार एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आले होते आणि दोन वर्ष त्यांनी हे पद सांभाळले होते. अमोल काळे यांचे नाव पवार-शेलार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते अमोल काळे हे एक उद्‌योगपती असून सध्या एमसीएचे उपाध्यक्षपद त्यांच्याकडे होते. अमोल काळे हे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.