भारतीय संघ सध्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. वर्ल्ड कप सुरू असतानाच सुरू असतानाच बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India) महत्त्वाची घोषणा केली आहे.
बीसीसीआयकडून (BCCI) एका नव्या प्रशिक्षकाची निवड करण्यात आली आहे. रणजी स्पर्धा गाजवणारे अमोल मुझुमदार हे भारतीय महिला संघाच्या (Indian women’s team) मुख्य प्रशिक्षकपदी असणार आहेत. सुलक्षण नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवडलेल्या अर्जदारांची मुलाखत घेतली. यावर विचारविनियम केल्यानंतर त्रिसदस्यीय समितीकडून एकमताने अमोल मुझुमदार यांची निवड करण्यात आली.
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : इस्त्रायलकडून संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांच्या राजीनाम्याची मागणी )
याविषयी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले की, मी भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अमोल मुझुमदार यांच्या नियुक्तीचे स्वागत करतो. मला विश्वास आहे की, त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघ खेळाच्या विविध फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करत राहिल. संघाने द्विपक्षीय आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. मला खात्री आहे की, आमच्या खेळाडूंना मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होईल.’
🚨 NEWS 🚨
Mr Amol Muzumdar Appointed as Head Coach – Team India (Senior Women).
Details 🔽https://t.co/6y0TiQ2prF
— BCCI Women (@BCCIWomen) October 25, 2023
या नियुक्तीविषयी अमोल मुझुमदार आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याबद्दल मला खूप सन्मान आणि विशेषाधिकार मिळाला आहे. माझ्या दूरदृष्टीवर आणि टीम इंडियासाठीच्या रोडमॅपवर विश्वास ठेवल्याबद्दल मी क्रिकेट सल्लागार समिती आणि बीसीसीआयचे आभार मानतो. ही मोठी जबाबदारी असून प्रतिभावान खेळाडूंसोबत जवळून काम करण्यास, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे. या कालावधीत दोन विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने पुढील दोन वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत.
अमोल मुझुमदार यांनी मुंबईसह अनेक रणजी विजेतेपद जिंकले आहेत. आसाम आणि आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे शिवाय देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्यांची २१ वर्षांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. १७१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३० शतकांसह ११,००० धावा केल्या असून १०० पेक्षा जास्त लिस्ट ए सामने आणि १४ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community