Andy Murray : पॅरिस ऑलिम्पिक ही अँडी मरेची शेवटची व्यावसायिक स्पर्धा?

Andy Murray : मरेच्या नावावर दोन ऑलिम्पिक सुवर्ण आहेत

126
Andy Murray : पॅरिस ऑलिम्पिक ही अँडी मरेची शेवटची व्यावसायिक स्पर्धा?
Andy Murray : पॅरिस ऑलिम्पिक ही अँडी मरेची शेवटची व्यावसायिक स्पर्धा?
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिकच्या इतिहासात दोन एकेरी सुवर्ण पदकं जिंकलेला अँडी मरे हा एकमेव टेनिसपटू आहे. पण, पॅरिस ऑलिम्पिकनंतर त्याने थांबायचं ठरवलं आहे. त्याच्या यशस्वी कारकीर्दीचा शेवट करण्यासाठी त्याने या स्पर्धेची निवड केली आहे. अँडी मरे हा ग्रेट ब्रिटनचा सगळ्यात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. २०१२ मध्ये अंतिम फेरीत रॉजर फेडररला हरवून त्याने पहिलं सुवर्ण जिंकलं होतं. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मार्टिन युआन डेल पोर्टोला हरवत त्याने सुवर्ण राखलंही. (Andy Murray)

(हेही वाचा- Union Budget 2024 : क्रीडा क्षेत्रासाठी २,४४२ कोटी रुपयांची तरतूद)

३७ वर्षीय अँडी मरेला कारकीर्दीत अनेक दुखापतींचा सामना करावा लागला. तरीही तो पुनरागमन करत राहिला. याच जिद्दीने त्याने २०१३ मध्ये पहिल्यांदा प्रतीष्ठेची विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. ७७ वर्षांनंतर एका ब्रिटिश खेळाडूने एकेरीत विजेतेपद पटकावल्यामुळे मरे रातोरात स्टार झाला. (Andy Murray)

त्यानंतर २०१६ मध्ये त्याने पुन्हा एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आता मात्र पॅऱिसला पोहोचल्या पोहोचल्या एक ट्विट करून त्याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. (Andy Murray)

 ‘माझ्या शेवटच्या टेनिस स्पर्धेसाठी मी पॅरिसला पोहोचलोय. ग्रेट ब्रिटनसाठी खेळणं ही आतापर्यंतच्या माझ्या कारकीर्दीतील सगळ्यात चांगली आठवण आहे. आणखी एकदा ही कामगिरी बजावताना मला आनंद होत आहे. ही माझी शेवटची स्पर्धा असेल,’ असं मरेनं बोलून दाखवलं. (Andy Murray)

गेल्या महिन्यात मरे त्याचा भाऊ जिमीसोबत विम्बल्डनच्या दुहेरीत खेळला.पण, पहिल्याच फेरीत त्यांचा पराभव झाल्यावर मरेनं ही शेवटची विम्बल्डन असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्या महिन्यात २२ जूनला त्याच्या मज्जातंतूत वाढलेली एक गाठ काढून टाकण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यानंतर केवळ जिद्दीने तो विम्बल्डनच्या दुहेरीत खेळला होता. (Andy Murray)

(हेही वाचा- Abhinav Bindra : अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक चळवळीतील योगदानासाठी ऑलिम्पिक ऑर्डर सन्मान)

आता तो व्यावसायिक टेनिसला राम राम करणार आहे. त्यासाठी त्याने पॅरिस ऑलिम्पिक निवडलंय. हे त्याचं पाचवं ऑलिम्पिक असणार आहे. बीजिंग ऑलिम्पिकपासून तो खेळतोय. त्याच्या खात्यात २ सुवर्ण जमा आहेत. तर त्याने तीन ग्रॅडस्लॅम विजेतेपदंही पटकावली आहेत. पॅरिसमध्ये तो एकेरी आणि दुहेरीतही खेळणार आहे. (Andy Murray)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.