Angelo Mathews Timed Out : अँजेलो मॅथ्यूज टाईम्ड आऊट झाल्यावर सोशल मीडियावरही कल्लोळ

विश्वचषक स्पर्धेत सोमवारी अँजेलो मॅथ्यूजच्या टाईम्ड आऊटचीच चर्चा होती. अनेकांना बांगलादेशी कर्णधाराचं हे वागणं रुचलेलं नाही. सोशल मीडियावरही दोन्ही बाजूंनी भरपूर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

210

ऋजुता लुकतुके

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर लंकन फलंदाज अँजेलो मॅथ्यूजने (Angelo Mathews Timed Out) एक नकोसा वाटणारा विक्रम आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम्ड आऊट झालेला तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचा बाद देतानाचा व्हीडिओ सोशल मीडियालरही व्हायरल झाला. आणि मग तिथे प्रतिक्रियांचाही पाऊस पडू लागला.

आधीचा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर त्या वेळेपासून २ निनिटांच्या आत मॅथ्यूजने (Angelo Mathews Timed Out) क्रीझवर यायला हवं होतं. एरवी हा वेळ ३ मिनिटांचा आहे. पण, या विश्वचषक स्पर्धेत हा वेळ २ मिनिटांचा ठेवण्यात आला आहे.

मॅथ्यूजला (Angelo Mathews Timed Out) उशीर झाल्यावर बांगलादेशच्या कर्णधाराने अपील केलं. आणि पंचांना मॅथ्यूजला टाईम्ड आऊट बाद द्यावं लागलं. प्रत्यक्षात मॅथ्यूज ड्रेसिंग रुममधून बाहेर आला होता. पण, हेलमेटचा स्ट्रॅप तुटल्यामुळे नवीन हेलमेटसाठी तो थांबला होता. अशावेळी शकीबने या नियमाचा वापर करणं याला अखिलाडू वृत्तीचं मानलं जात आहे.

आणि अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यावर म्हणालाय, ‘चला! क्रिकेटमध्ये आता एवढंच बघायचं बाकी होतं.’

तर गौतम गंभीरलाही झालेला प्रकार दुष्टपणाचा वाटला.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ख्वाजा युनिसने तर सविस्तर अँजेलो मॅथ्यूजची बाजू मांडली आहे. आणि त्यानंतर हे खूप वाईट असल्याचं म्हटलंय.

तर आफ्रिकन गोलंदाज डेल स्टेनने हे नक्कीच चांगलं नाही, असं म्हणत पुढे घड्याळाचा इमोजी काढला आहे.

तर अभिनव सिंग यांनी नियम हा नियम असतो, असं म्हणत, एमसीसीची नियमावलीच ट्विट केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.