Wasim Akram : “रोज ८ किलो मटण …”; सलग तिसऱ्या पराभवानंतर वसीम अक्रमचा पाकिस्तानी खेळाडूंना घरचा आहेर

123
Wasim Akram : "रोज ८ किलो मटण ..."; सलग तिसऱ्या पराभवानंतर वसीम अक्रमचा पाकिस्तानी खेळाडूंना घरचा आहेर

विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या २२ व्य सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर (Wasim Akram) विजय मिळवला. अफगाणिस्तानने हा सामना ८ गडी राखून जिंकला. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव आहे. यापूर्वी त्यांना ऑस्ट्रेलिया आणि भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत आतापर्यंत पाकिस्तानची फिल्डिंग खूपच खराब राहिली आहे. पाकिस्तान संघाने ५ सामन्यांत बरेच झेल सोडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने (Wasim Akram) पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर एका स्पोर्ट्स शोमध्ये बोलतांना वसीम अक्रम (Wasim Akram) म्हणाले की, “आजचा दिवस खरोखरच वाईट होता. अफगाणिस्तानने केवळ २ विकेट गमावून २८० धावा केल्या. ही खूप मोठी गोष्ट आहे. पाकिस्तानची फिल्डिंग पहा. तीन आठवड्यांपासून असे दिसते की हे खेळाडू 2 वर्षांपासून फिटनेस टेस्टसाठी गेलेच नाहीत.

(हेही वाचा – Dasara Melava 2023 : मेळाव्यांचा दसरा; दसरा मेळाव्यातून कोण कोणावर तोफ डागणार?)

पाकिस्तानी संघातील काही खेळाडू (Wasim Akram) दररोज ८ किलो मटण खात आहेत. मात्र अजूनही ते फिट नाही. सर्व खेळाडूंना देशासाठी खेळण्यासाठी पैसे मिळतात. जेव्हा मिसबाह-उल-हक प्रशिक्षक होता, तेव्हा कोणालाही तो आवडला नाही. त्याची फिटनेस चांगली होती. क्षेत्ररक्षणासाठी तंदुरुस्ती खूप महत्त्वाची असते. आम्ही (पाकिस्तानी संघ) तेच करत नाही आहोत. आम्ही अजूनही त्याच स्थितीत आहोत.

“सध्या सुरू असलेल्या 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान हा सर्वात वाईट क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने अनेक झेल सोडले, खूप धावा दिल्या आणि धावबाद होण्याच्या संधीही गमावल्या. जर त्याची कामगिरी अशीच राहिली तर त्याला पहिल्या चारमध्ये पोहोचणे कठीण झाले असते. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी पाकिस्तानला आता सर्व सामने जिंकावे लागतील. (Wasim Akram)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.