ऋतुजा-अंकिताने दुहेरीचे पटकावले विजेतेपद!

157

ऑस्ट्रेलियातील बेन्डिगो येथे आयटीएफ महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैना आणि ऋतुजा भोसलेने विजेतेपदाचा बहुमान पटकावला आहे. अंतिम सामन्यात या भारतीय जोडीने अलेक्झांड्रा बोझोव्हिक व वेरोनिका फाल्कोवस्का या जोडीवर  4-6, 6-3, 10-4 असा विजय मिळवला आहे. पुढील आठवड्यात ही भारतीय जोडी याच स्पर्धास्थळावर अन्य एका स्पर्धेत पुन्हा एकदा खेळणार आहे.

असा रंगला सामना

सुरुवातीपासूनच ही लढत चुरशीची झाली होती. 1 तास 35 मिनीटे ही लढत चालली. सहाव्या गेमअखेर 3-3 अशी बरोबरी होती. त्यानंतर अलेक्झांड्रा- वेरोनिका यांनी सलग दोन गेम जिंकून 5-3 अशी आघाडी घेतली. नवव्या गेममध्ये ऋतुजा- अंकिताने 40-30 आघाडीसह ब्रेक- पाॅईंट मिळवला. त्यानंतर सलग दोन गेम जिंकून ऋतुजा आणि अंकिता यांनी बाजी मारली आणि जेतेपदावर आपले नाव कोरले.

Rutuja 1

 

( हेही वाचा: बसमध्ये तुमचाही फोन हरवलाय? तर ही यादी वाचाच )

भारतात टेनीस खेळाचे फार कमी चाहते असल्याची खंत व्यक्त केली. अजूनही या खेळासाठी कोणाचीही मदत मिळत नाही. शासन मदत करेल, असं काही होत नाही. आपल्यालाच स्वखर्चाने सामन्यांना जावे लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
– संपतराव भोसले, ऋतुजाचे वडील

महाराष्ट्राच्या कन्येची (ऋतुजा) कामगिरी

  •  वयाच्या 9 वर्षापासून टेनीस खेळायला सुरुवात
  • युवा ज्येष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा विक्रम
  • आशियाई क्लोस्ड जूनियर चॅम्पियनशिपचे जेतेपद.
  • 2012 रॉयल इंडिया ओपनमध्ये WTA टूर मॅच जिंकणारी सानिया मिर्झा नंतर पहिली भारतीय.
  • ज्युनियर ग्रँडस्लॅम दुहेरी ऑस्ट्रेलिया 2012 मध्ये उपांत्य फेरी गाठली
  • भारतीय फेड कप संघातील 16 वर्षे वयाची सर्वात तरुण सदस्य, 2012, 2013 आणि 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • झिम्बाब्वे येथे आयटीएफ ज्युनियर मीटमध्ये दुहेरी जेतेपद पटकावले.
  • महाराष्ट्र शासनाचा 2017-2018 वर्षाचा श्री. छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त
  • ऑस्ट्रेलिया, चीन, थायलंड आणि भारत येथे 3 एकल, 17 दुहेरी आणि 8 उपविजेत्या महिला ITF स्पर्धा जिंकल्या.
  • इजिप्तमध्ये सिंगलचे विजेतेपद जिंकले.
  • आशियाई स्पर्धा 2018 मध्ये सहभाग.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.