यंदाच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत म्हणजे, 15 ऑगस्टपर्यंत देशभरात 1,000 खेलो इंडिया केंद्रे सुरु केली जातील, असे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. नागपूरच्या पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापैकी, 945 केंद्रांना याधीच मंजूरी देण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
( हेही वाचा : एसटी धावणार विद्युत वेगाने! ताफ्यात येणार ५ हजार १५० ई-बस )
देशभरात 1,000 खेलो इंडिया केंद्रे
यंदाच्या अर्थसंकल्पात 3,797 कोटी रुपये क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाला देण्यात आले आहेत. तसेच, खेलो इंडिया क्रीडास्पर्धांमध्ये नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात असून देशात मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. खासदार क्रीडा महाकुंभ स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता देशभरात 1,000 खेलो इंडिया केंद्रे सुरु केली जाणार आहेत असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
खेळाडूंसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांची माहिती देताना ठाकूर म्हणाले, भारतीय क्रीडा प्राधिकरण, खेलो इंडिया केंद्र, टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम योजना यामुळे खेळाडूंना ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी फायदा होतो. खेळाडुंसाठी देशात 23 राष्ट्रीय केंद्रे आहेत, याठिकाणी सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या केंद्रांमध्ये, राहण्यासाठी आणि जेवणासाठीच्या सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community