Anurag Thakur : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत उत्कृष्ट कामगिरी करेल – अनुराग ठाकूर

174
Anurag Thakur : ‘देशातील ॲथलीटना देणार डिजिटल कार्ड,’ - अनुराग ठाकूर

गेल्या काही वर्षांपासून भारताने सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये (Anurag Thakur) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आज आपले खेळाडू जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावत आहेत. त्याप्रमाणेच आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारत पदकतालिकेत उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री (Anurag Thakur) अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.

पटियाला येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेला (एनआयएस) ठाकूर (Anurag Thakur) यांनी सोमवारी (२८ ऑगस्ट) भेट दिली. एनआयएसचे वरिष्ठ कार्यकारी संचालक कर्नल राज सिंह बिश्नोई आणि इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. क्रीडा पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने अनेक नूतनीकरण प्रकल्पांचे उद्घाटन करण्याबरोबरच त्यांनी मुष्टियुद्ध, अॅथलेटिक्स आणि कबड्डी या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Anurag Thakur) सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्र्यांनी (Anurag Thakur) १३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले यात अत्याधुनिक वेटलिफ्टिंग हॉल, तंदुरुस्ती केंद्र , आधुनिक वसतिगृहे आणि अतिथीगृह यांचा समावेश आहे. भारतीय वेट लिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव हे देखील उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

(हेही वाचा – Delhi Liquor Scam : लाच घेतल्याच्या आरोपाखाली ईडी अधिकाऱ्यालाच सीबीआयकडून अटक)

अनौपचारिक संवादात क्रीडा मंत्र्यांनी (Anurag Thakur) खेळाडूंशी त्यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या तयारीबद्दल चर्चा केली आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी त्यांची कौशल्ये आणि मानसिक लवचिकता सुधारण्यासाठी प्रेरणा दिली. तयारीदरम्यान खेळाडूंना येणाऱ्या प्रत्येक लॉजिस्टिक समस्यांबाबत त्यांनी चर्चा केली.

राष्ट्राला अभिमान वाटावा म्हणून झटणाऱ्या क्रीडापटूंसोबत (Anurag Thakur) मंत्र्यांनी साधलेल्या संवादाने क्रीडापटूंमध्ये दृढनिश्चय आणि नवी ऊर्जा संचारली. तत्पूर्वी आज सकाळी केंद्रीय मंत्र्यांनी आयएएसईआर मोहाली येथील रोजगार मेळाव्यात नियुक्ती पत्रे प्रदान केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.