ऋजुता लुकतुके
तिरंदाजीतील विश्वचषक स्पर्धेला (Archery Team Misses Event) गुरुवारी अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरूवात झाली आहे. पण, महिलांचा कम्पाऊंड तिरंदाजीचा संघ व्हिसाच वेळेवर न मिळाल्यामुळे स्पर्धेला वेळेत पोहोचू शकला नाही. आणि त्यांच्यावर स्पर्धेला मुकण्याची वेळ आली. तिरंदाजी संघटनेनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला मध्यस्थी ठेवून खेळाडूंच्या व्हिसासाठी अमेरिकन इमिग्रेशन केंद्राकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर गुरुवारी ९ पैकी ८ खेळाडूंना व्हिसा मिळाला. पण, त्यांची कम्पाऊंड सांघिक स्पर्धा तरीही हुकलीच. (Archery Team Misses Event)
हेही वाचा-IPL 2025, Virat Kohli : विराट कोहलीचा आणखी एक विक्रम, आयपीएलमध्ये १,००० वेळा चेंडू सीमापार
‘खेळाडूंचे व्हिसा उशिरा आले. बुधवारपर्यंत त्यांचा काही पत्ता नव्हता. त्यामुळे आधी ठरवलेली तिकिटं रद्द करावी लागली. आणि त्यानंतर नवीन काढायची म्हटलं तर विमानं भरलेली होती. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून खेळाडूंना अमेरिका गाठण्यासाठी गुरुवार रात्र उजाडली. आणि महिला खेळाडू कम्पाऊंड प्रकारात सहभागी होऊ शकल्या नाहीत. इतर स्पर्धा मात्र सुरळीत सुरू झाली आहे,’ असं तिरंदाजी संघटनेचे सहाय्यक सचिव गुंजन अबरोल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. (Archery Team Misses Event)
हेही वाचा- Waqf Amentment Act : वक्फबाबत जनजागृतीसाठी भाजपा देशभरात राबवणार ‘वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान’ !
दरम्यान, या स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारातच पुरुषांच्या संघाने कांस्य पदक जिंकलं आहे. ओजस देवताळे, अभिषेक वर्मा आणि रिषभ यादव या खेळाडूंनी डेन्मार्कचा २३० विरुद्ध २२३ गुणांनी पराभव करत पदक नावावर केलं. महिलांना पदकाची संधीच मिळाली नाही. संघाचे प्रशिक्षक तेजा यांनी झाल्याप्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. (Archery Team Misses Event)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community