- ऋजुता लुकतुके
मुंबईतील प्रसिद्घ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या स्मृती स्थळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांचे सगळे नावाजलेले शिष्य एकत्र आले होते. यात सचिन तेंडुलकर, प्रवीण आम्रे, अतुल बेदाडे, बलविंदर सिंग संधू, संजय बांगर, चंदू पंडित यांच्याबरोबर विनोद कांबळीचाही (Vinod Kambli) समावेश होता. या स्मारकाच्या उभारणीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोठा वाटा होता. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी (Vinod Kambli) हे जुने मित्र पुन्हा एकत्र आले. सचिन व्यासपीठावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी बोलत असताना विनोदने तिथे एंट्री घेतली. आणि लगेचच सचिनने ठाकरेंची रजा घेऊन विनोदची गळाभेट घेतली. आणि त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. दोघांच्या या भेटीचे व्हिडिओ त्वरित सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
(हेही वाचा – तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे Devendra Fadnavis यांची कशी आहे शैक्षणिक कारकीर्द ?)
#WATCH | Maharashtra: Former Indian Cricketer Sachin Tendulkar met former cricketer Vinod Kambli during an event in Mumbai.
(Source: Shivaji Park Gymkhana/ANI) pic.twitter.com/JiyBk5HMTB
— ANI (@ANI) December 3, 2024
या भेटीमुळे सचिन आणि विनोद यांची मैत्री आजही कायम आहे असंच उपस्थितांना जाणवलं. दोघं शालेय जीवनापासून एकत्र खेळले आहेत. दोघांनी १४ वर्षांखालील हॅरिस शिल्ड स्पर्धेत ६६४ धावांची विश्वविक्रमी भागिदारी रचली होती. त्या दिवसानंतर दोघांची आंतररा्ष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण झाली. दोघांपैकी सचिन भारतीय संघात सगळ्यात आधी आला. आणि त्याने जागतिक क्रिकेटवर पुढील २२ वर्षं राज्य केलं. २०० कसोटी खेळताना त्याने १५,००० च्या वर धावाही केल्या. तर विनोद कांबळी भारताकडून फक्त १७ कसोटी खेळल्या. आणि यात त्याने दोन द्विशतकांसह १,०८४ धावा केल्या.
(हेही वाचा – BMC : बालवाडीतील मुलांना मिळणार जादुई पिटारा)
शिस्तीचा अभाव आणि तंदुरुस्तीत अनियमितता यामुळे कांबळीची कारकीर्द लवकर संपुष्टात आली. त्यानंतर काही काळ विनोद कांबळी (Vinod Kambli) टिव्हीवर क्रिकेट समालोचन किंवा इतर क्रिकेट विषयक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचा. पण, काही वर्षांनी हे अचानक थांबलं. आणि पुन्हा एकदा विनोद कांबळी (Vinod Kambli) प्रकाशझोतात आला तो एका सहकारी बँकेचं कर्ज बुडवल्या प्रकरणी. त्याच्या घरावर जप्ती येत असतानाचा व्हिडिओ टीव्हीवर दाखवला जात होता. त्यातून विनोदची आर्थिक स्थिती खालावल्याचं लोकांना समजलं.
तर काही महिन्यांपूर्वी विनोद कांबळीचा (Vinod Kambli) चालताना तोल जात असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्याची तब्येतही बरी नसल्याचं पसरलं होतं. काही वर्षांपूर्वीच विनोदवर बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. आणि त्यानंतर त्याने सचिनवर एक उघड टिप्पणी केली होती. ‘मला गरज असताना सचिनने मला एकट्याला टाकलं. तो माझ्याजवळ नव्हता,’ असं तो म्हणाला होता.
सचिनने त्यावर कधीही उघड भाष्य केलं नाही. पण, दोघांमधील मैत्री आता संपली अशी चर्चा मीडियामध्ये सुरू झाली होती. पण, सचिनने आपल्या अकृत्रिम कृतीने त्याच्या विनोद विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community