- ऋजुता लुकतुके
दिग्गज खेळाडू लायनेल मेस्सीने (Lionel Messi) क्रमांक १० ची जर्सी लोकप्रिय केली आहे. आणि त्याच्या सन्मानार्थ ही जर्सी निवृत्त करण्यात येणार आहे. (Argentina Jersey No 10)
अर्जेंटाईन दिग्गज खेळाडू लायनेल मेस्सी (Lionel Messi) अजून राष्ट्रीय संघातून निवृत्त झालेला नाही. पण, तो निवृत्त झाला की, त्याच्या बरोबरच त्याची १० क्रमांकाची जर्सीही निवृत्त करण्याचा निर्णय अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने (Argentina Football Association) जाहीर केला आहे. म्हणजेच त्याच्या नंतर अर्जेंटिनाची १० क्रमांकाची जर्सी कुणीही घालू शकणार नाही. (Argentina Jersey No 10)
मेस्सीची (Lionel Messi) जागा कुणी घेऊ शकत नाही, असंच फुटबॉल असोसिएशनला सुचवायचं आहे. (Argentina Jersey No 10)
भारतातही अलीकडेच बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) क्रमांक ७ ची क्रिकेट जर्सी निवृत्त केल्याचा निर्णय जाहीर केला होता. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्लाओडिओ तापिया पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ‘मेस्सी (Lionel Messi) राष्ट्रीय संघातून निवृत्त झाला, की त्यानंतर दहा क्रमांकाची जर्सी कुणालाच देण्यात येणार नाही. मेस्सीचा (Lionel Messi) सन्मान म्हणून हा निर्णय आम्ही घेतलाय. आणि त्याच्यासाठी निदान ही किमान गोष्ट करावी, असं असोसिएशनला वाटतं.’ (Argentina Jersey No 10)
(हेही वाचा – Rs 2000 Currency Notes : ९७.३८ टक्के २००० रुपयाच्या नोटा बँकांकडे परत आल्याची रिझर्व्ह बँकेची माहिती)
हा होता अलिखित नियम
खरंतर मेस्सी (Lionel Messi) खेळाडू म्हणून नावारुपाला येत होता, तेव्हा दहा क्रमांकाच्या जर्सीची लोकप्रियता वाढत होती. पेले, मॅराडोना यांच्या सारख्या आधीच्या पिढीतील दिग्गजांनी ही जर्सी परिधान केल्यामुळे संघातील प्रमुख खेळाडू १० क्रमांकाची जर्सी घालणार असा अलिखित नियम बनला होता. (Argentina Jersey No 10)
त्यानुसार, अर्जेंटिनासाठी मॅराडोना यांच्यानंतर मेस्सीला दहा क्रमांकाची जर्सी मिळाली. खरंतर अर्जेंटिनाच्या फुटबॉल असोसिएशनला मॅराडोनाच्या सन्मानार्थ तेव्हाच १० क्रमांकाची जर्सी निवृत्त करायची होती. पण, तेव्हा म्हणजे २००२ च्या फिफा नियमानुसार, संघातील सर्वच्या सर्व २३ खेळाडूंना सलग क्रमांक देणं बंधनकारक होतं. त्यामुळे फक्त अर्जेंटिनाच नाही तर कुणालाच एखादी जर्सी निवृत्त करणं शक्य झालं नाही. आता फिफाचे नियम बदलले आहेत. आणि त्यानंतर लगेचच अर्जेंटिनाने हा निर्णय जाहीर केला आहे. (Argentina Jersey No 10)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community