-
ऋजुता लुकतुके
भारताचा युवा बुद्धिबळपटू अर्जुन एरिगसीने (Arjun Erigaisi) युरोपीयन चेस क्लब चॅम्पियनशिपमध्ये अल्कालॉईड क्लबकडून खेळताना दमदार कामगिरी केली आहे. आणि पाचव्या फेरीत रशियाच्या दिमित्री आंद्रेकिनला हरवतानाच त्याने कारकीर्दीतील दोन महत्त्वाचे मापदंड ओलांडले आहेत. त्याने २८०० एलो रेटिंगचा टप्पा ओलांडला आहे. आणि जागतिक क्रमवारीतही तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. २८०० एलो रेटिंग गाठणारा तो विश्वनाथन आनंद नंतरचा फक्त दुसरा बुद्धिबळपटू आहे. तर जागतिक स्तरावर अशी कामगिरी फक्त १६ बुद्धिबळपटूंनी केली आहे.
अशी कामगिरी करणारा तो भारताचा वयाने सगळ्यात लहान बुद्धिबळपटू आहे. फ्रेंच अलीरेझा फिरोझा हा जागतिक स्तरावर २८०० एलो गुण पार करणारा वयाने सगळ्यात लहान बुद्धिबळपटू आहे. त्याने १८ वर्षं आणि ५ महिन्यांचा असताना हा टप्पा सर केला होता. तर मॅग्नस कार्लसन वयाच्या १९ व्या वर्षी २८०० एलो गुणांचा धनी झाला होता. (Arjun Erigaisi)
ARJUN CROSSES 2800 🔥🔥
Congrats to @ArjunErigaisi on becoming the latest member of the legendary 2800 club! 🇮🇳📈 pic.twitter.com/4HtE3kcmiG
— Chess.com (@chesscom) October 24, 2024
यापूर्वी बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत अर्जुनने मॅक्झिम वेशिअरला हरवून ती स्पर्धा जिंकली होती. या विजेतेपदाने त्याला २७.८४ फिडे सर्किट गुण मिळाले. तसंच २०,००० पाऊंडांचं बक्षीसही मिळालं. तेव्हाच अर्जुन जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचांत पोहोचला होता. तेव्हाच त्याने विश्वनाथन आनंदला पहिल्यांदा क्रमवारीत मागे टाकलं होतं. आनंद आता आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात सक्रिय नसला तरी २८१७ एलो रेटिंग गुणांसह आठव्या स्थानावर आहे. (Arjun Erigaisi)
(हेही वाचा- Amit Thackeray: अमित ठाकरेंनी उद्धव काकांना सुनावलं; म्हणाले, “ते कसे आहेत तेव्हाच मला कळालं होतं…”)
मागच्या काही महिन्यात अर्जुन एरिगसी खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये अर्जुनने वैयक्तिक तसंच सांघिक स्पर्धेतही सुवर्णाची कमाई केली होती. त्याचबरोबर सिगेमन स्पर्धेत तो दुसरा होता. जागतिक स्तरावर २८०० एलो रेटिंग गुण असलेले इतर बुद्धिबळपटू बघूया (Arjun Erigaisi)
१. मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) – २८८२
२. गॅरी कॅस्परोव्ह (रशिया) – २८५१
३. फॅबिआनो करुआना (अमेरिका) – २८४४
४. लिवॉन एरोनियन (आर्मेनिया) – २८३०
५. वेस्ली सो (अमेरिका) – २८२२
६. शाख्रियार मेमद्रायोग (अझरबैजान) – २८२०
७. मॅक्झिम विशिअर (फ्रान्स) – २८१९
८. विश्वनाथन आनंद (भारत) – २८१७
९. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) – २८१७
१०. व्हेसलिन तोपालोव (बल्गेरिया) – २८१६
१५. अर्जुन एरिगसी (भारत) – २८०२.१