Arjun Tendulkar रणजी सामन्यात चमकला

अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदा रणजी सामन्यात ५ बळी घेतले आहेत.

119
Arjun Tendulkar रणजी सामन्यात चमकला
Arjun Tendulkar रणजी सामन्यात चमकला
  • ऋजुता लुकतुके

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा आणि गोव्याचा तेज गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) रणजी सामन्यात पहिल्यांदा डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. २५ वर्षीय डावखुरा गोलंदाज अर्जुनने अरुणाचल प्रदेश विरुद्ध २५ धावांत ५ बळी मिळवले. अर्जुनचा हा १७ वा प्रथमश्रेणी सामना आहे. खरंतर या सामन्यात अरुणाचलने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली होती. पण, सामन्याच्या दुसऱ्याच षटकांत अर्जुनने सलामीवीर नबम हचांगला बाद केलं.

त्यानंतर नीलम ओबी (२५) आणि चिन्मय पाटील (३) यांनी काही वेळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, बाराव्या षटकांत पुन्हा एकदा अर्जुननेच दोघांनाही बाद केलं. त्यानंतर अरुणाचलची अवस्था ५ बाद ३६ झाली. अरुणाचल प्रदेशकडून कर्णधार नबम आबोनं सर्वाधिक २५ धावा केल्या. अर्जुनला मोहित रेडकर (१५/३) आणि किथ मार्क पिंटा (२/३१) यांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे पहिल्या डावात अरुणाचल प्रदेशचा संघ ८४ धावांतच सर्वबाद झाला.

(हेही वाचा – Assembly Elections 2024 : नातूंवर टीका रामदास कदमांच्या मुलाला गुहागरमध्ये भोवणार?)

अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) यापूर्वी आपल्या १६ प्रथमश्रेणी सामन्यांत ३२ बळी मिळवले होते. तर यापूर्वी त्याची सर्वोत्तम कामगिरी होती ती ४९ धावांत ४ बळी. फलंदाज म्हणूनही अर्जुन उपयुक्त आहे. आणि आतापर्यंत त्याने एक शतक आणि २ अर्धशतकांसह ५३८ धावा केल्या आहेत.

अर्जुन सध्या प्लेट स्तरावर खेळत असला तरी त्याच्या कामगिरीने त्याने या हंगामात छाप पाडली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडूनही तो यंदाचा हंगाम खेळला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.