- ऋजुता लुकतुके
थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत मिथुन मंजुनाथ आणि दुहेरीत गायत्री, त्रिसा यांचं आवाहन शुक्रवारी संपुष्टात आलं. त्यामुळे स्पर्धेत आता एकमेव भारतीय आव्हान उभं आहे ते महिला एकेरीत अश्मिता चलिहाचं (Ashmita Chaliha). २४ वर्षीय डावखुरी अश्मिता (Ashmita Chaliha) मात्र कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत आलेली अश्मिता (Ashmita Chaliha) मानांकित खेळाडूंविरुद्ध खेळताना जराही गडबडून गेली नाही. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या इस्टर नुरुमी वारदोयोचा तिने १४-२१, २१-१९ आणि २१-११ असा पराभव केला. (Ashmita Chaliha)
अश्मिता (Ashmita Chaliha) सध्या जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानावर आहे. पण, पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल नंतर बॅडमिंटन सुपर सीरिजच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती फक्त तिसरी भारतीय महिला ठरली आहे. (Ashmita Chaliha)
Ashmita registers a superb victory to enter her first semifinal in a #BWFWorldTour Super 300 event 👌🔥
Well played champ, keep it up 👏
📸: @badmintonphoto #ThailandMasters2024 #IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/FbpLksE55R
— BAI Media (@BAI_Media) February 2, 2024
(हेही वाचा – Ind vs Pak Davis Cup Tie : कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार भारत – पाक डेव्हिस चषक सामना)
असा जिंकला खेळ
२४ वर्षीय अश्मिताने (Ashmita Chaliha) सामन्यात सुरुवात चांगली करून १४-१४ अशी बरोबरी साधली होती. पण, त्यानंतर वारदोयोने सलग ७ गुण जिंकत पहिला गेम खिशात टाकला. त्यानंतर मात्र अश्मिताने (Ashmita Chaliha) आपल्या खेळात आमूलाग्र बदल केले. नेट जवळ चांगला खेळ करत आणि कठीण गुणांच्या वेळी डोकं शांत ठेवत तिने दुसरा गेम १५-१९ अशा पिछाडीवरून २१-१९ असा जिंकला. आणि त्यानंतर मात्र तिने सामन्यात मागे वळून पहिलं नाही. (Ashmita Chaliha)
मागचे काही दिवस सलग सामने खेळूनही तिने दम कायम ठेवला. आणि उलट प्रतिस्पर्ध्याला दमवून चुका करायला भाग पाडल्या. तिसरा गेम तिने २१-११ असा आरामात जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Ashmita Chaliha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community