- ऋजुता लुकतुके
या आठवड्यात रवीचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी अश्विनने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ३८ व्या वर्षी भारताचा दुसरा सर्वाधिक यशस्वी फिरकीपटू म्हणून अश्विन निवृत्त झाला आहे. अनिल कुंबळेच्या ६१९ बळींच्या मागोमाग अश्विन (५३७) चा क्रमांक लागतो आणि मालिकावीरांच्या पुरस्कारांच्या बाबतीत अश्विन सगळ्यात पुढे आहे. एकूण ९ मालिकांमध्ये अश्विन मालिकावीर ठरला होता. (Ashwin Retires)
अश्विन भारतीय संघात स्थिरावण्यासाठी धडपडत होता, तेव्हा हरभजन सिंगच्या रुपाने संघात आधीच एक ऑफ स्पिनर मौजूद होता. अशावेळी अश्विन आणि हरभजन यांचं आपापसात जमन नाही, अशा अफवा अनेकदा पसरल्या. पण, अश्विनच्या निवृत्तीनंतर आमच्यात कधीच बेबनाव नव्हता असं हरभजनने स्पष्ट केलं आहे. (Ashwin Retires)
(हेही वाचा – Ashwin Retires : अश्विनला निवृत्तीनंतर कुणी कुणी फोन केले? ट्विट करून दिली माहिती)
‘मी सोशल मीडियावर आमच्याविषयी लिहून येत असलेलं सगळं वाचतो आहे. पण, यात काहीही तथ्य नाही. जर कधी भांडण झालंच असतं तर मी सरळ जाऊन अश्विनला विचारलं असतं की, काय बिनसलंय? तितका मोकळेपणा आमच्यात आहे. पण, भांडण कधीच झालं नाही,’ असं अश्विन आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला. गोलंदाज म्हणूनही हरभजनने अश्विनचं कौतुक केलं. (Ashwin Retires)
‘तो खूपच चांगला खेळाडू आहे आणि कसोटीत त्याने मिळवलेलं यश सगळ्यांच्यासमोर आहे. अनिल कुंबले लेगस्पिन गोलंदाजी टाकायचा हे पाहता, अश्विन भारताचा सगळ्यात यशस्वी ऑफ स्पिन गोलंदाज म्हणावा लागेल. तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता,’ असं हरभजनने बोलून दाखवलं. अश्विन कसोटीच्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमी प्रभावी ठरला. एकूण ३७९ डावांमध्ये अश्विनने ७६५ आंतरराष्ट्रीय बळी मिळवले. तर हरभजनने आपल्या कारकीर्दीत ७०७ आंतरराष्ट्रीय बळी मिळवले. (Ashwin Retires)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community