Ashwin Retires : निवृत्तीच्या २४ तासांत रवीचंद्रन अश्विन भारतात परतला

Ashwin Retires : चेन्नईत अश्विनचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

131
Ashwin Retires : निवृत्तीच्या २४ तासांत रवीचंद्रन अश्विन भारतात परतला
  • ऋजुता लुकतुके

आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केल्या केल्या २४ तासांच्या आत रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) भारतात परतलाय. बुधवारी निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही तासांतच तो भारतीय ड्रेसिंग रुम आणि हॉटेलमधून गायब झाला होता. समारोपाच्या भाषणातही त्याने ‘आजपासून मी तुमच्यात नसेन,’ अशीच भाषा वापरली होती आणि आता गुरुवारी दुपारी तो चेन्नईत दाखल झाला आहे. चेन्नई विमानतळावर त्याचे कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांनी त्याचं स्वागत केलं. अनिल कुंबळेच्या (६१९) खालोखाल सर्वाधिक कसोटी मिळवणारा भारतीय फलंदाज म्हणून त्याचं नाव विक्रमांच्या यादीत कोरलं गेलं आहे.

अश्विनच्या (Ravichandran Ashwin) नावावर ५३७ कसोटी बळी आहेत. तो विमानतळावरून बाहेर आला तेव्हा सनई आणि ढोलाचा गजर चाहत्यांनी केला. त्याचे शेजारीही घराबाहेर जमले होते. त्यांनी फुलांची उधळण अश्विनवर केली.

(हेही वाचा – ICC Test Championship : भारतीय संघ अजूनही आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठू शकतो?)

बुधवारी ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर अनपेक्षितपणे अश्विनने (Ravichandran Ashwin) आपल्या निवृत्तीची घोषणा केली. सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहितबरोबर अश्विनने प्रवेश केल्यावरच सगळ्यांच्या भुवया उंचवलेल्या होत्या आणि अश्विनने, ‘माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हा शेवटचा दिवस असेल,’ असं म्हणत सगळ्यांचा निरोप घेतला. बोर्डर-गावस्कर मालिका १-१ अशी रंगतदार अवस्थेत असताना अश्विनने मध्यातच हा निर्णय घेतला आहे. आता अश्विन क्लब स्तरावरील क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

(हेही वाचा – Free Laptop Scam Alert : शाळकरी मुलांसाठी मोफत लॅपटॉपचा संदेश खोटा असल्याचा पीआयपीचा निर्वाळा)

कसोटींत ५३७ बळी मिळवण्याबरोबरच अश्विनने (Ravichandran Ashwin) ७ कसोटी शतकंही ठोकली आहेत आणि त्यामुळेच आयसीसीच्या अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत अश्विन आताही अव्वल आहे. अश्विनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली खरी. पण, पहिल्या पर्थ कसोटीत अंतिम अकरा जणांत त्याला स्थान मिळालं नाही. तर ॲडलेड कसोटीत तो चमक दाखवू शकला नाही. तिसऱ्या ब्रिस्बेन कसोटीत त्याच्या ऐवजी रवींद्र जाडेजाचा समावेश झाला. त्यानंतर तडकाफडकी अश्विनने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या पराभवानंतर लगेचच अश्विनच्या मनात निवृत्तीचे विचार घोळू लागले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.