-
ऋजुता लुकतुके
रविचंद्रन अश्विन ब्रिस्बेन कसोटीनंतर निवृत्ती जाहीर करून मायदेशात परतही आलाय. पण, अचानक जाहीर केलेल्या निर्णयामुळे त्याविषयीची चर्चा काही कमी होत नाहीए. आता तो चेन्नईत पोहोचून २४ तास उलटले नाहीत, तोच त्याच्या वडिलांनी खळबळजनक विधान केलं आहे. मुलाने अपमानाला कंटाळून निवृत्ती घेतल्याचं रविचंद्रन म्हणतायत. तर अश्विनने लगेचच काही वेळात, वडिलांचं म्हणणं मनावर घेऊ नका, असं म्हणत सारवासारव केली आहे. त्यामुळे निवृत्तीचं गूढ अजूनही उकलेललं नाही. (Ashwin Retires)
(हेही वाचा- Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकात भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणीच होणार, आयसीसीने केलं स्पष्ट)
‘अश्विन निवृत्ती जाहीर करणार आहे हे मलाच शेवटच्या क्षणी कळलं. मला त्याला आणखी काही काळ सर्वोच्च स्तरावर खेळलेलं पाहायचं होतं. अर्थात, त्याच्या निर्णयात मी ढवळाढवळ करणार नाही. निर्णय त्यानेच घ्यायचा होता. पण, त्यामागे काहीतरी कारण नक्की असणार. कदाचित अपमान आणि नालस्ती हे एक कारण असावं,’ असं रविचंद्रन सीएननन्यूज १८ शी बोलताना म्हणाले आहेत. (Ashwin Retires)
‘एकीकडे आश्चर्य वाटलं असलं तरी थोडंफार त्याच्या मनातलंही कळत होतं. त्याला अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळे तो कधीतरी असा निर्णय घेऊन मोकळा होईल, असंही वाटत होतं,’ असं पुढे रविचंद्रन यांनी म्हटलं आहे. संघातून सातत्याने वगळण्यात येत असल्यामुळे अश्विन या निवृत्तीच्या निर्णयापर्यंत पोहोचला, असाच त्यांच्या बोलण्याचा रोख होता. (Ashwin Retires)
(हेही वाचा- Jaipur Chemical tanker Explosion : केमिकल टँकरच्या भीषण स्फोटात ५ जणांचा होरपळून मृत्यू)
अश्विनने मात्र तातडीने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं. एका ट्विटला उत्तर देताना, ‘ते काय म्हणाले ते विसरून जा. त्यांना मीडियाशी बोलायची सवय नाही. त्यांना माफ करा. आणि एकटं सोडा,’ असं अश्विनने म्हटलं आहे. (Ashwin Retires)
My dad isn’t media trained, dey father enna da ithelaam 😂😂.
I never thought you would follow this rich tradition of “dad statements” .🤣
Request you all to forgive him and leave him alone 🙏 https://t.co/Y1GFEwJsVc
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) December 19, 2024
अश्विनने बुधवारी ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. आणि २४ तासांच्या आत तो ऑस्ट्रेलिया सोडून मायदेशातही परतला आहे. भारताकडून १०६ कसोटी खेळताना त्याने ५३७ बळी मिळवले आहेत. अनिल कुंबळेच्या ६१९ बळींनंतर कसोटीतील तो दुसरा सर्वाधिक यशस्वी भारतीय गोलंदाज आहे. (Ashwin Retires)
(हेही वाचा- Champions Trophy 2025 : आयसीसीच्या पत्रकात भारत – पाक क्रिकेटविषयी नेमकं काय म्हटलंय?)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला ॲडलेड कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. पण, उर्वरित दोन कसोटींसाठी त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर अश्विनने तातडीने निवृत्तीचा निर्णय जाहीर करून मालिकाही अर्धवट सोडली आहे. मालिकेत अजून दोन कसोटी बाकी आहेत. (Ashwin Retires)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community