Ashwin Retires : ऐका! अश्विनचं ड्रेसिंग रुममधील शेवटचं भाषण, ऑस्ट्रेलियाकडून विशेष शुभेच्छा 

Ashwin Retires : ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही अश्विनची खास भेट घेतली

56
Ashwin Retires : ऐका! अश्विनचं ड्रेसिंग रुममधील शेवटचं भाषण, ऑस्ट्रेलियाकडून विशेष शुभेच्छा 
Ashwin Retires : ऐका! अश्विनचं ड्रेसिंग रुममधील शेवटचं भाषण, ऑस्ट्रेलियाकडून विशेष शुभेच्छा 
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन कसोटी संपल्यावर रविचंद्रन अश्विनने सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला. मालिकेच्या मध्यावरच त्याने निवृत्तीची घोषणा करून टाकली. पाचव्या दिवशी शेवटचे काही तास बाहेर पाऊस पडत असताना अश्विन विराट कोहलीबरोबर बसला होता. दोघं बराच काळ गप्पा मारत होते. अखेरीस विराटने अश्विनला जोरदार मिठी मारली. त्यावरून काहीतरी वेगळं सुरू असल्याचा अंदाज आला होता. पत्रकार परिषदेत रोहीतबरोबर अश्विन आल्यावर मनातील भीती खरी ठरल्याचंच सिद्ध झालं. (Ashwin Retires)

(हेही वाचा- Unauthorized Constructions : बेहराम पाडा, गरीब नवाज नगरमध्ये झोपड्यांचे टॉवर बनले, आम्ही नाही पाहिले)

भारतीय ड्रेसिंग रुममध्ये त्यानंतर भारावलेलं वातावरण होतं. अश्विनने सहकाऱ्यांसमोर समारोपाचं भाषण केलं. ही गोष्ट बाहेर उघड झाल्यामुळे माजी खेळाडूंचे संदेशही सुरू झाले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही अश्विनला विशेष शुभेच्छा दिल्या. अश्विनने १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ५३७ बळी मिळवले. अनिल कुंबळेच्या पाठोपाठ तो भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज ठरला. तर जगभरात ५०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा तो फक्त आठवा गोलंदाज आहे. अशा गोलंदाजाला निरोप देण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लिऑन भारतीय ड्रेसिंग रुममध्ये आले. त्यांनी अश्विनला आपली जर्सी स्वाक्षरी करून भेट म्हणून दिली. (Ashwin Retires)

तर अश्विनने आपल्या भाषणात सहकाऱ्यांचे आभार मानले.

 ‘मला माझा २०११ चा ऑस्ट्रेलिया दौरा आठवतो. मी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात आलो होतो. राहुल भाईचा तो शेवटचा दौरा होता. भारतीय संघ तेव्हा स्थित्यंतरातून जात होता. राहुल भाई पाठोपाठ सचिन पाजी संघातून गेले. हे सगळ्यांच्या बाबतीत घडणार, हे तेव्हाच मला कळलं. सगळ्यांची वेळ येते. आज माझी आली आहे. पण, मधला काळ मी अगदी मनापासून जगलो आहे. माझे इथं खूप चांगले मित्र झाले. आता मी भारतात परत जाणार आहे. पण, तुम्ही मेलबर्न आणि सिडनीमध्ये कशी कामगिरी करता, यावर माझं लक्ष असणार आहे,’ असं अश्विनने म्हटल्यावर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यातही पाणी तरळलं. (Ashwin Retires)

(हेही वाचा- MSRTC : एसटी प्रवाशांना नवीन वर्षाचे गिफ्ट; ३५०० लालपरी बसेस होणार दाखल)

पत्रकार परिषदेत रोहितनेही अश्विनला जोरदार आलिंगन दिलं. अश्विनच्या कारकीर्दीचा गौरव करणाऱ्या ट्विटची मालिका तोपर्यंत सुरू झाली होती. (Ashwin Retires)

(हेही वाचा- Assembly Winter Session : शहरी नक्षलवाद विरोधी विशेष कायद्याचे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवणार !)

रविचंद्रन अश्विन आता तातडीने भारतात परतणार आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपलं असलं तरी देशांतर्गत क्रिकेट खेळत राहणार असल्याचं अश्विनने म्हटलं आहे. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपलं असलं तरी माझ्यात अजून काहीसं क्रिकेट बाकी आहे. मी क्लब क्रिकेट खेळत राहणार आहे,’ असं अश्विनने म्हटलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल फ्रँचाईजीने अश्विनला ९.७५ कोटी रुपये देऊन कायम ठेवलं आहे. त्यामुळे पुढील हंगाम तो खेळणार आहे.  (Ashwin Retires)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.