- ऋजुता लुकतुके
रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर मायदेशी परतला आहे आणि त्याच्यावर चहू बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराटने त्याच्या निवृत्तीच्याच दिवशी एक मोठा संदेश लिहून त्याच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर तर संदेशांचा पाऊस पडत होता. अश्विन, अनिल कुंबळेच्या नंतरचा भारताचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. १०६ कसोटींत त्याने ५३७ बळी मिळवले आहेत आणि ५०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा तो जगातील फक्त आठवा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची दखल घेणं स्वाभाविकच होतं. (Ashwin Retires)
काहींनी सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या. तर काहींनी त्याला वैयक्तिक फोनही केले आणि अशा दोन व्यक्तींची नावं खुद्द अश्विनने सोशल मीडियावर सांगितली आहेत. त्यासाठी त्याच्या फोनमधील ‘कॉल लॉग’च त्याने ट्विट केला आहे. यातील पहिलं नाव आहे सचिन तेंडुलकर आणि दुसरं नाव आहे कपिल देव. सचिनबरोबर त्याने फेसटाईमवर ऑडिओ कॉल केला आहे. तर कपिल देव यांनीही त्याला कॉल केलेला दिसत आहे. (Ashwin Retires)
(हेही वाचा – भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षल कनेक्शन; विधानसभेत Devendra Fadnavis काय म्हणाले?)
If some one told me 25 years ago that I would have a smart phone with me and the call log on the last day of my career as an Indian cricketer would look like this☺️☺️, I would have had a heart attack then only. Thanks @sachin_rt and @therealkapildev paaji🙏🙏 #blessed pic.twitter.com/RkgMUWzhtt
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) December 20, 2024
‘२५ वर्षांपूर्वी जर मला कुणी सांगितलं असतं की, तुझ्याकडे एक मोबाईल फोन असेल आणि तुझ्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी या फोनचा कॉल लॉग हा असा दिसेल, तर मला त्याच दिवशी ह्रदयविकाराचा झटका आला असता. सचिन आणि कपिल पाजी यांचे मी शतश: आभार मानतो,’ असं अश्विनने लिहिलं आहे. सचिन तेंडुलकर आणि रवीचंद्रन अश्विन दोन वर्ष एकत्र कसोटी क्रिकेट खेळले आहेत आणि दोघंही २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. (Ashwin Retires)
आपल्या १३ वर्षांच्या कारकीर्दीत अश्विनने अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळख मिळवली आणि ५३७ कसोटी बळींबरोबरच ७ कसोटी शतकांसह त्याने ३,००० च्या वर धावाही केल्या. अश्विनसारख्या खेळाडूला सन्मानाने निवृत्त होण्याची संधी मिळायला हवी होती, असं मत अलीकडेच कपिल देव यांनी व्यक्त केलं होतं. (Ashwin Retires)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community