Ashwin Retires : अश्विनने निवृत्तीचा निर्णय नेमका कधी घेतला?

Ashwin Retires : विराट, रोहित यांच्या परस्परविरोधी वक्तव्यातून काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे 

41
Ashwin Retires : निवृत्तीच्या २४ तासांत रवीचंद्रन अश्विन भारतात परतला
  • ऋजुता लुकतुके

रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर करून बुधवारी खळबळ उडवून दिली. मालिकेत दोन कसोटी अजून बाकी असताना हा आपला शेवटचा दिवस आहे, असं त्याने ड्रेसिंग रुमला सांगून टाकलं. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यांपैकी अश्विनला ॲडलेडची दुसरी कसोटी खेळण्याची संधी मिळाली. पण, त्यात तो फारशी चमक दाखवू शकला नाही. उर्वरित दोन कसोटींत वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांची निवड झाली. मालिकेच्या मध्यातच निवृत्ती जाहीर केल्यामुळे अश्विनने हा निर्णय नेमका घेतला कधी यावर आता चर्चा सुरू झाली आहे. त्यातच रोहित आणि विराट यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे सगळे बुचकाळ्यात पडले आहेत. (Ashwin Retires)

विराट आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतो, ‘आपण १४ वर्ष एकत्र खेळलो. आणि आज जेव्हा तू मला येऊन सांगितलंस की, आज तुझा शेवटचा दिवस आहे, तेव्हा मीच थोडासा भावूक झालो. एकत्र घालवलेले सगळे क्षण डोळ्यासमोर तराळले.’ म्हणजे विराटच्या मते त्याला बुधवारीच ही गोष्ट समजली.  (Ashwin Retires)

(हेही वाचा- बांधकामांमुळे होणारे प्रदूषण टाळा; Navi Mumbai Municipal Corporation ने जारी केली मार्गदर्शिका)

तर पत्रकार परिषदेत रोहितने घोषणा केली तेव्हा तो म्हणाला, ‘मी पर्थमध्ये आलो तेव्हा मला याबद्दल समजलं. मी कसोटीचे पहिले २-३ दिवस संघाबरोबर नव्हतो. पण, मी आलो तेव्हा ही चर्चा सुरू होती. तेव्हापासून अश्विनच्या मनात ही गोष्ट रेंगाळत होती. निवृत्ती ही एक प्रक्रिया आहे. आणि त्याने नेमकं कधी ठरवलं हे तोच सांगू शकेल.’ (Ashwin Retires)

पुढे रोहित असंही म्हणतो की, ‘ऑस्ट्रेलियात आम्ही पोहोचलो तेव्हा इथलं वातावरण आणि खेळपट्टी कशी असेल आम्हाला माहीत नव्हतं. किती आणि कोणत्या फिरकीपटूंना संघात स्थान मिळेल, हे आम्हालाच माहीत नव्हतं. अशावेळी पहिल्या कसोटीत वॉशिंग्टनला खेळवण्याचं ठरलं. तेव्हाच माझी पहिल्यांदा अश्विनशी चर्चा झाली होती. मी त्याला ॲडलेड कसोटी खेळण्यासाठी कसंबसं राजी केलं.’ (Ashwin Retires)

(हेही वाचा- विधान परिषदेच्या सभापतीपदी Ram Shinde; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्राध्यापक राम शिंदे हे…”)

तर त्याच्या जवळच्या मित्रांच्यामते न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतरच निवृत्तीचा विचार अश्विनच्या मनात घोंघावत होता. त्याने ऑस्ट्रेलिया दौरा फक्त एक शेवटची संधी म्हणून पाहिला. थोडक्यात, पर्थ कसोटीत संघात स्थान मिळालं नाही, हे पाहूनच अश्विनचा निवृत्तीचा विचार बळावला असावा. (Ashwin Retires)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.