-
ऋजुता लुकतुके
रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इतकंच नाही तर एका दिवसांत तो ब्रिस्बेनमधून रवानाही झाला आहे. तो लगेचच भारतात परतणार आहे. सगळीकडे अश्विनच्या निवृत्तीची चर्चा सुरू असताना, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मात्र अश्विनच्या या कृतीची तुलना महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीशी केली आहे. २०१४ – १५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनीनेही तिसरी कसोटी संपल्यावर अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. (Ashwin Retires)
(हेही वाचा- Maharashtra Weather: थंडीचा कडाका कायम; पारा घसरला, ‘या’ भागांत तापमान कमालीचं घसरलं)
‘या मालिकेनंतर मी भारतीय संघासाठी उपलब्ध नसेन, असं त्याला सांगता आलं असतं. अशी अचानक मालिका सोडल्यामुळे भारतीय संघातून एक खेळाडू अचानक कमी होतो. निवड समिती काही विचार करून खेळाडू आणि संघ निवडत असते. अशावेळी मालिकेत मध्यावर अश्विनने असा निर्णय घ्यायला नको होता. २०१४ मध्ये धोणीनेही असंच केलं होतं,’ असं मत गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना व्यक्त केलं. (Ashwin Retires)
दुसरा मुद्दा गावसकरांनी उचलला तो अश्विनच्या जागी नवीन खेळाडू तयार करण्याचा. ‘ऑस्ट्रेलिया सारख्या खडतर दौऱ्यात अश्विनसारखा खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये असल्यानेही फरक पडतो. सिडनीची खेळपट्टी तर फिरकीला पोषक आहे. तिथे त्याचा उपयोगही झाला असता. वॉशिंग्टन सुंदरला कसोटसाठी तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. तो तयार होण्यापूर्वीच अश्विनने माधार घेतली. ही वेळ चुकलीच,’ असं गावसकर म्हणाले. (Ashwin Retires)
(हेही वाचा- प्रशासकीय दिरंगाई ही अनधिकृत बांधकामांची ढाल होऊ शकत नाही; Supreme Court ने दिले निर्देश)
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने अश्विनवर एक ट्विटकरून त्याच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.
.@ashwinravi99 🐐🤍 pic.twitter.com/z4VlTpVf4M
— Washington Sundar (@Sundarwashi5) December 18, 2024
वॉशिंग्टन सुंदर आणि अश्विन दोघंही तामिळनाडूतून येतात. त्यामुळे दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही एकत्र वेळ घालवला आहे. ‘तामिळनाडूत चेपकवर खेळताना मी तुला अनेकदा पाहिलं आहे. तुझ्याक़डून मैदानावर आणि मैदानाबाहेरही कसं वागायचं हे शिकलो आहे. भारतीय ड्रेसिंग रुममध्येही तुझ्याबरोबर घालवलेला वेळ माझ्यासाठी खूप काही देऊन गेला आहे. तुझ्या पुढील उपक्रमांसाठीही तुला शुभेच्छा,’ असं सुंदरने म्हटलं आहे. (Ashwin Retires)
(हेही वाचा- Ashwin Retires : ऐका! अश्विनचं ड्रेसिंग रुममधील शेवटचं भाषण, ऑस्ट्रेलियाकडून विशेष शुभेच्छा )
अश्विनने निवृत्ती घेतलेला काळ भारतीय क्रिकेटसाठी कसोटीचा आहे. बोर्डर – गावसकर मालिकेत सध्या १ – १ बरोबरी आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारताला उर्वरित दोन्ही कसोटी जिंकणं आवश्यक आहे. (Ashwin Retires)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community