भारत आणि पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने

140

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश कायम एक दुस-यांच्या समोर शत्रू म्हणून उभे राहतात, या दोन्ही देशांमधील क्रिकेटचे सामनेदेखील एखाद्या युद्धाप्रमाणे खेळले जातात. आशियाई क्रिकेट परिषदेने शनिवारी, १९ मार्च आशिया चषक २०२२ ची तारीख जाहीर केली. आगामी आशिया कप २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे क्रिकेट संघ समोरासमोर येणार आहेत.

भारताने सलग दोनदा विजेतेपद पटकावले

यात क्वालिफायर सामने २० ऑगस्टपासून सुरू होतील, पण एसीसीने त्याचे वेळापत्रक अजूनही जाहीर केलेले नाही. २०१६ नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. २०१८ मध्ये शेवटच्या वेळी आशिया चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी भारताने ५० षटकांची स्पर्धा जिंकली होती. ७ वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाच्या नजरा ८व्या विजेतेपदासह विजयाच्या हॅट्रीककडे असेल. भारताने २०१६ आणि २०१८ मध्ये सलग दोन विजेतेपद पटकावली आहेत. आशिया चषक स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते, पण २०२० ची स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषदेने कोरोना महामारीमुळे रद्द केली होती. यामुळे समितीने यंदा ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या आशियातील पाच कसोटी दर्जाच्या संघांना थेट प्रवेश मिळाला आहे, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांतून निश्चित केला जाईल.

(हेही वाचा राष्ट्रवादी म्हणते, ‘…म्हणून भाजपला न्युमोनिया झाला’)

भारताकडे सर्वाधिक विजेतेपद

आशिया चषक पहिल्यांदा १९८४ मध्ये यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून ही स्पर्धा आशियाई संघांमध्ये १५ वेळा खेळली गेली आहे. यामध्ये भारताने सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने २०१८ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.