आज म्हणजेच रविवार १७ सप्टेंबर रोजी भारतीय संघ आठव्यांदा (Asia Cup 2023 Final) आशिया चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना श्रीलंका आणि भारत या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आतापर्यंत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका सात वेळा लढले आहेत. यापैकी ७ अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघाने चार वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेनं तीन वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे, यावर्षी कोण सरस ठरणार हे पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत.
श्रीलंकेच्या (Asia Cup 2023 Final) हसरंगासारख्या स्टार अष्टपैलू खेळाडूच्या दुखापतीमुळे लंकेची टीम अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करू शकणार नाही असं बोललं जात होतं. मात्र लंकेच्या युवा खेळाडूंच्या जोरावर त्यांनी पाकिस्तान संघाचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
Here’s the #TeamIndia squad for the ICC Men’s Cricket World Cup 2023 🙌#CWC23 pic.twitter.com/EX7Njg2Tcv
— BCCI (@BCCI) September 5, 2023
(हेही वाचा – Kokan Ganeshotsav 2023 : रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं; नियोजनाच्या अभावामुळे गाड्या ६ तास उशीरानं)
दरम्यान, आजच्या सामन्यात (Asia Cup 2023 Final) देखील पावसाने हजेरी लावली तर अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. आज पाऊस आला तर उद्या म्हणजेच १८ सप्टेंबर, सोमवारी हा अंतिम सामना खेळवला जाईल.
आशिया चषकाच्या अंतिम फेरीत (Asia Cup 2023 Final) प्रेमदासा स्टेडियमवर आज भारत-श्रीलंका संघ आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेतील सुपर फोर फेरीत भारताने श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनाही धूळ चारली होती. तर, श्रीलंकेने आधी बांगलादेशला पराभूत केलं आणि नंतर पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर मात करत फायनल मध्ये प्रवेश केला. त्यामुळे आजच्या सामन्यात मनोबल उंचावलेल्या श्रीलंकन टीमसमोर भारताचा कस लागणार हे नक्की. या सामन्यात भारतासाठी अक्षर पटेलची दुखापत ही काहीशी चिंतेची बाब आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाली. त्याच्यासाठी राखीव खेळाडू म्हणून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, श्रीलंकेचा फिरकीपटू महेश तीक्ष्णा दुखापतीमुळे अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही. त्याची अनुपस्थितीही लंकन (Asia Cup 2023 Final) टीमला जाणवू शकते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community