Asia Cup 2023 India vs Sri lanka : श्रीलंकेच्या २० वर्षांच्या तरुणाने भारतीय क्रिकेट संघातील रथी महारथींना पाठवले माघारी    

122

२० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागे याने आजचा दिवस संस्मरणीय बनवला. Asia Cup 2023 India vs Sri lanka मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या यांच्या सारख्या दिग्गजांसह शुबमन गिल या भविष्याचा स्टार मानल्या जाणाऱ्या खेळाडूला फिरकीच्या जाळ्यात ओढले. त्याने १० षटकांत ४० धावांत ५ विकेट्स घेत श्रीलंकेकडून मोठा विक्रम नोंदवला. पार्ट टाईम गोलंदाज चरिथ असालंकाची साथ मिळाली.

रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिल्यानंतर  वेलालागेने वर्चस्व गाजवले. त्याने त्याच्या पहिल्या षटकात शुबमनचा (१९) त्रिफळा उडवला, दुसऱ्या षटकात विराटला (३) झेलबाद केले अन् तिसऱ्या षटकात रोहितला (५३) त्रिफळाचीत केले. लोकेश राहुल व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. श्रीलंकेच्या फिरकी माऱ्याचा दोघांनी संयमाने सामना केला. पण, लोकेशचा संयम वेलालागेन तोडला. इशानसह ८९ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करणारा लोकेश ( ३९) कॉट अँड बोल्ड झाला. इशानच्या खेळीचे कौतुक करावे तितके कमी…श्रीलंकेच्या फिरकीचा त्याने चांगला सामना केला अन् खराब चेंडू मिळताच उत्तुंग फटके खेचले. पण, पार्ट टाईम गोलंदाज चरिथ असालंकाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान ३३ (६१ चेंडू) धावांवर वेलालागेच्या हाती झेल देऊन माघारी परतला. चरिथच्या अप्रतिम चेंडूवर रवींद्र जडेजा ( ४) यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. चरिथने ४३व्या षटकात जसप्रीत बुमराहचा ( ५) त्रिफळा उडवला. पुढच्याच चेंडूवर कुलदीप यादवही गोल्डन डकवर परतला. पण, त्याची हॅटट्रीक हुकली. पावसामुळे खेळ थांबला. भारताने ४७ षटकांत ९ बाद १९७ धावा केल्या आहेत.

(हेही वाचा Shri Ram Mandir : बाळासाहेबांचा मुलगा असे वक्त्यव्य करतो, ही लज्जास्पद बाब; श्रीराम मंदिरावरून उद्धव ठाकरेंच्या विधानावर भाजपचा हल्लाबोल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.