Asia Cup 2025 : २०२६चा आशिया चषक भारतात होणार

Asia Cup 2025 : ही आशिया चषक स्पर्धा टी-२० प्रकारातील असेल .

148
Asia Cup 2025 : २०२६चा आशिया चषक भारतात होणार
Asia Cup 2025 : २०२६चा आशिया चषक भारतात होणार
  • ऋजुता लुकतुके

२०२५ मध्ये होणारी आशिया चषक स्पर्धा (Asia Cup 2025) भारतात होणार असल्याचं आशिया क्रिकेट परिषदेनं जाहीर केलं आहे. पुढील वर्षी टी-२० प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. २०२३ ची स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेत संयुक्तपणे झाली होती. आणि ही स्पर्धा एकदिवसीय होती. २०२७ ची आशिया चषक स्पर्धा ही पुन्हा एकदा एकदिवसीय प्रकारात खेळवली जाईल. आणि ती बांगलादेशमध्ये होईल.

आशिया चषक स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. आणि यात ६ आशियाई संघ सहभागी होतात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान हे संघ कायम राहतात. तर आणखी एका संघाची निवड ही पात्रता स्पर्धेतून होते. प्रत्येक स्पर्धेत १३ सामने होतात.. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसीला दरवर्षी एक क्रिकेट स्पर्धा आयसीसीच्या छत्राखाली आयोजित करायची आहे. २०२५ मध्ये चॅम्पियन्स करंडक होणार आहे. त्यामुळे आशिया चषकातील स्पर्धा ही टी-२० करण्यात आली आहे. (Asia Cup 2025)

(हेही वाचा – Lucknow मध्ये संघाच्या शाखेवर मुसलमानांची दगडफेक)

आशियाई स्तरावरील क्रिकेटचा कार्यक्रम ठरवताना महिला आशिया चषकाविषयीचे निर्णयही घेण्यात आले आहेत.

२०२६ मध्ये पुन्हा एकदा महिलांची आशिया चषक स्पर्धा होणार असून ती टी-२० प्रकारातच होणार आहे. २०२४ साली झालेली आशिया चषक टी-२० स्पर्धा रविवारीच संपली असून श्रीलंकन महिला संघाने भारताचा पराभव करून यात विजेतेपद पटकावलं होतं. (Asia Cup 2025)

१९ वर्षांखालील गटातही आशिया चषकाची स्पर्धा भरवण्याचा पुढाकार यंदा आशियाई क्रीडास्पर्धेनं घेतला आहे. आणि सुरुवातीला चार टप्प्यांची आखणी करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.