- ऋजुता लुकतुके
आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुषांना उपउपांत्य फेरीत जपानकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. लक्ष्य सेनला गवसलेला फॉर्म हे भारतीय खेळाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. एक एस प्रणॉय, किदम्बी श्रीकांत आणि साईसात्त्विक तसंच चिराग ही अव्वल जोडी खेळत असूनही भारताचा पराभव झाला. केंटा निशिमोटो आणि केंटो मोमेटो हे जपानचे अव्वल खेळाडू एकेरीत सरस ठरले. (Asian Badminton Championship)
So close yet so far!
Well played boys, proud of you 🙌#BATC2024#TeamIndia#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/pkdoQZpG7a
— BAI Media (@BAI_Media) February 16, 2024
भारत जपान टायमध्ये पहिली लढत होती ती एच एस प्रणॉय आणि जपानचा केंटा निशिमोटो यांच्यात. यात प्रणॉयने चांगली लढत दिली. पहिला गेम त्याने १६-२१ ने गमावला. पण, दुसऱ्या गेममध्ये त्याने विजयाच्या निर्धाराने खेळ केला. पण, लागोपाठ दोन दिवस दीर्घ काळ चाललेले सामने खेळून तो दमला होता. आणि त्याच नेटजवळ खेळताना त्याच्याकडून चुकाही झाल्या. अखेर दुसरा गेम त्याने २४-२६ ने गमावला. आणि भारतीय संघ ०-१ असा पिछाडीवर पडला. (Asian Badminton Championship)
(हेही वाचा – Asian Badminton Championship : आशियाई सांघिक स्पर्धेत महिला संघाचं पदक निश्चित)
दुसरी लढत सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी विरुद्ध केनया आण हिरोकी यांच्यात होती. आणि भारतीय जोडीने ही लढत २१-१५ आणि २१-१७ अशी आरामात जिंकली. यामुळे भारताने १-१ अशी बरोबरीही साधली. यावर कडी केली ती लक्ष्य सेनने दुसरा एकेरी सामना जिंकून. लक्ष्यने कोरी वाटानाबे या जपानच्या उगवत्या खेळाडूला २१-१९ आणि २२-२० असं हरवलं. वाटानाबेनं लक्ष्यला दमवलं. पण, त्याने सामन्यावरील नियंत्रण जाऊ दिलं नाही. (Asian Badminton Championship)
Sen-sational Lakshya puts #TeamIndia in front 😍🔥
📸: @badmintonphoto#BATC2024#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/W8XFcBjoD5
— BAI Media (@BAI_Media) February 16, 2024
लक्ष्यमुळे भारताला मिळालेली आघाडी दुसरी दुहेरीतील जोडी ध्रुव कपिला आणि अर्जुन कायम ठेवू शकले नाहीत. आणि शेवटचा सामना भारताचा माजी नंबर वन श्रीकांत आणि जपानचा एके काळचा आघाडीचा खेळाडू आणि ऑलिम्पिक चॅम्पियन केंटो मोमेटो यांच्यात होती. मोठ्या काळानंतर मोमेटो आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये परतत होता. त्यामुळे श्रीकांतचं पारडं सुरुवातीला जड वाटत होतं. पण, मोमेटोनं जिद्द सोडली नाही. पहिला गेम १७-२१ असा गमावल्यावर त्याने दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतवर चांगलंच दडपण आणलं. हा गेम त्याने २१-७ असा खिशात टाकला. आणि तिसरा गेमही २२-२० असा जिंकत सामना जिंकला. आणि भारताचाही ३-२ असा पराभव झाला. (Asian Badminton Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community