-
ऋजुता लुकतुके
कम्पाऊंड तिरंदाजी प्रकारात भारतीय तिरंदाजांनी पदकांची लयलूट सुरूच ठेवली आणि शेवटच्या दिवशी ओजस देवतळे आणि ज्योती वेन्नम यांनी त्यात दोन सुवर्ण पदकांची भरही घातली. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी आपली कमाल दाखवून दिली. शनिवारी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी कम्पाऊंड प्रकारात पुरुष तसंच महिला एकेरीत भारतीयांचाच डंका दिसून आला. पुरुषांची अंतिम फेरी तर दोन भारतीयांमध्येच होती. त्यामुळे प्रवीण ओजस देवतळेला सुवर्ण आणि अभिषेक वर्माला रौप्य पदक मिळालं. अंतिम सामनाही चुरशीचा झाला. आणि ओजसने त १४९ विरुद्ध १४७ गुणांनी जिंकला. एकट्या कम्पाऊंड प्रकारात भारतीय संघाने ९ पदकं जिंकली आणि यात ६ सुवर्ण आहेत. (Asian Games 2023)
🇮🇳 𝐃𝐎𝐔𝐁𝐋𝐄 𝐕𝐈𝐂𝐓𝐎𝐑𝐘🥇🥈
🏹Compound Archers Pravin Ojas Deotale (#KheloIndiaAthlete) and @archer_abhishek win the GOLD🥇 and SILVER 🥈respectively at the #AsianGames2022. 🤩🥳
This is the 8th and 9th medal for India and the 6th Gold medal in Compound Archery 🤩
🇮🇳… pic.twitter.com/BYFcQmSl5k
— SAI Media (@Media_SAI) October 7, 2023
(हेही वाचा – Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मुलांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, PMLA कोर्टाचे काय आहे निरीक्षण)
कम्पाऊंडमध्ये सांघिक प्रकारातही पुरुषांनी सुवर्ण जिंकलं होतं. पुरुषांच्या अंतिम सामन्यापूर्वी काही काळ आधी महिलांनीही इतिहास रचला होता. महिलांच्या कम्पाऊंड एकेरीच्या अंतिम लढतीत भारताच्या ज्योती वेन्नमने सुवर्ण पटकावलं. ज्योतीचा मुकाबला दक्षिण कोरियाच्या चायवॉनशी होता. कोरिया ही तिरंदाजीतील ताकद समजली जाते. त्यामुळे हा सामना कठीण होता. पण, ज्योतीने शांत डोक्याने लक्ष्यभेद करत १४९ विरुद्ध १४५ अशा गुणफरकाने हा सामना जिंकला. ज्योती तिरंदाजीतील भारताची उगवती खेळाडू समजली जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत तिने आश्वासक मजल मारली आहे. (Asian Games 2023)
भारताची अदिती गोपीचंद या स्पर्धेत तिसरी आली. तिला कांस्यपदक मिळालं. कम्पाऊंड प्रकाराचा समावेश ऑलिम्पिक खेळांमध्ये नसतो. त्यामुळे हा प्रकार काहीसा दुर्लक्षित आहे. पण, भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आंतरराष्ट्रीय संघटनेला अनेकदा या क्रीडाप्रकाराच्या ऑलिम्पिक समावेशाची विनंती करण्यात आली आहे. (Asian Games 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community