ऋजुता लुकतुके
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू असल्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे दुय्यम संघ आशियाई क्रीडास्पर्धेत (Asian Games 2023) खेळत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानच्या दुय्यम संघानेही पाकिस्तानचा क्रिकेटमध्ये पराभव केला हा मथळा उपान्त्य फेरीच्या सामन्यासाठी लागू होईल.
#AfghanAbdalyan have demonstrated an excellent all-round display to beat @TheRealPCB by 4 wickets in the semi-final and make it to the Grand Finale of the #AsianGames Men’s Cricket Competitions 2023.
📸: @GettyImages
More 👉: https://t.co/qXJEgzlW19 pic.twitter.com/f0btlRXYQT
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 6, 2023
कारण, पाकिस्तानचा संघ लढतीत पूर्णपणे ढेपाळलेला होता. प्रथम फलंदाजी करताना आधी त्यांना किमान २०-३० धावा कमी पडल्या. सलामीवीर ओमर युसुफने चांगल्या सुरुवातीनंतर विकेट फेकली. तर इतर फलंदाज मैदानावर टिकून राहण्याचा प्रयत्नच करत नव्हते. परिणामी, पाकच्या अव्वल पाच फलंदाजांनी दुहेरी धावसंख्याही गाठली नाही.
संघासाठी सर्वोच्च धावा ओमारच्या २३. आणि त्याव्यतिरिक्त आठव्या क्रमांकावर आलेला अराफत (१३) आणि नवव्या क्रमांकाच्या ओमारने (१४) निदान दुहेरी आकडा गाठला. आणि त्यामुळे पाक संघही शंभरी पार करू शकला. पण, संघाने निर्धारित २० षटकंही पूर्ण केली नाहीत. १८ षटकांत ११५ धावा करून पार संघ बाद झाला. त्यांना अवांतर धावाच १७ मिळाल्या. (Asian Games 2023)
(हेही वाचा-Goregaon Fire : एसआरएच्या इमारतींचे ऑडिट होणार’, गोरेगावातील आगीमधील जखमींची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट)
अफगाणिस्तानचं निम्मं काम इथंच झालेलं होतं. फरीद अहमदने १५ धावांमध्ये ३ बळी टिपले. उरलेलं निम्मं काम फलंदाजांनी बरोबर १८ षटकांत पूर्ण केलं. अफगाणिस्तानचे आघाडीचे फलंदाजही फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. पण, तिसऱ्या क्रमांकावर आलेला नूर अली झरदान पाय रोवून उभा राहिला, त्याने ३९ धावा केल्या. तर कर्णधार गुलबदिन नैबने शेवटी येऊन २३ धावा केल्यामुळे अफगाणिस्तानचा विजय शक्य झाला.
स्पर्धेची अंतिम फेरी ७ ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी पार पडेल. यात भारत आणि अफगाणिस्तान हे संघ आता आमनेसामने असतील. भारतीय संघ अर्थात सुवर्णपदाचा दावेदार असेल. सकाळी साडेअकरा वाजता ही लढत रंगेल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community