Asian Games 2023 : १० हजार मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत रौप्य व कांस्य दोन पदके जिंकली

109
Asian Games 2023 : १० हजार मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत रौप्य व कांस्य दोन पदके जिंकली
Asian Games 2023 : १० हजार मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत रौप्य व कांस्य दोन पदके जिंकली

चीनमधील हांगझोऊ शहरात सुरू असलेल्या १९ व्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू कौतुकास्पद कामगिरी करताना दिसत आहेत. (Asian Games 2023) एकाहून एक विजयाची घौडदौड सुरूच आहे. शनिवारी (३० सप्टेंबर) रोजी १० हजार मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत भारतीय खेळाडूंनी फायनलमध्ये भारताने रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली आहेत. या स्पर्धेत कार्तिक कुमार याने रौप्य तर गुलवीर सिंगने कास्य पदकावर नाव कोरले. Asian Games 2023

१० हजार मीटर शर्यतीत कार्तिक कुमारने २८:१५.३८s वेळेची नोंद करत रौप्य पदक नावावर केले. दुसरीकडे, गुलवीर सिंगने 28:17.21s वेळेची नोंद करत तिसऱ्या स्थानी राहून कास्य पदक कमावले. त्यामुळे या शर्यतीत दोन भारतीयांनी पदकं नावावर केली. चीनच्या हांगझोऊ येथे आशियाई स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू कमाल करत असून पदकांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर आहेत. (Asian Games 2023)

(हेही वाचा : Temple : देशभरातील साडेचार लाख मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात लढा उभारावा – सुनील घनवट)

विशेष म्हणजे १०० मीटरची स्पर्धा शिल्लक असताना भारताच्या दोन्ही खेळाडूंनी आघाडी घेतली. आणि पदकं निश्चित केले. सुवर्ण पदकं बहारिनच्या खेळाडूने नावावर केले. बिरहानू रेमातेव बालेव याने 28:13.62 वेळ घेत सुवर्ण पदकावर नाव कोरले. आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. दरम्यान, आशियाई स्पर्धत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरुच आहे. मेन्स स्क्वाश स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत झाली, पण भारताने बाजी मारली. भारताने 2-1 फरकाने पाकिस्तानवर मात केली. त्यामुळे स्क्वाश स्पर्धेचे सुवर्ण पद भारताच्या खात्यावर जमा झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.