Asian Games 2023 : चीनला नमवत भारताची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई

गेल्या काही स्पर्धांमधील परंपरेप्रमाणे यंदाही भारताला पहिलं सुवर्ण नेमबाजीतच मिळालं आहे.

151
Asian Games 2023 : चीनला नमवत भारताची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई

ऋजुता लुकतुके

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने स्पर्धेतील (Asian Games 2023) पहिल्या सुवर्ण पदकाची नोंद केली आहे. पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, नेमबाजीत, भारताच्या दिव्यांश पनवर, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वरी तोमर या त्रिकुटाने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.

दोघांनी अंतिम फेरीत १,८९३.७ गुणांची कमाई केली. रौप्य पदक (Asian Games 2023) विजेत्या दक्षिण कोरियन संघाला १,८९०.१ गुण मिळाले. तर चीनला १८८८ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. हा नवीन विश्वविक्रमही आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये (Asian Games 2023) कोल्हापूरचा रुद्रांश पाटील सर्वोत्तम ठरला. त्याने दुसऱ्यांदा लक्ष्य भेदताना १०६.७ गुणांची कमाई केली. १०६ गुणांची कमाई त्याने दोनदा केली.

(हेही वाचा – Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का! परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाची मोठी कारवाई)

विशेष म्हणजे या तिघांनी नवीन विश्वविक्रम, आशियाई विक्रम (Asian Games 2023) आणि क्रीडास्पर्धेतील विक्रम रचला आहे. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताने जिंकलेलं हे पहिलं सुवर्ण आहे. या व्यतिरिक्त आतापर्यंत भारतीय संघाने १ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह एकूण ७ पदकं जिंकली आहेत. भारतीय संघ पदक तालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. तर चीनचा संघ ४० पदकांसह प्रथम क्रमांकावर आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.