होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळांचा (Asian Games 2023) आज म्हणजेच मंगळवार ३ ऑक्टोबर हा दहावा दिवस आहे. अशातच आजपासून क्रिकेट सामने सुरु झाले आहेत. भारताने नेपाळला २३ धावांनी हरवून उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
आजच्या सामन्यात भारताने नेपाळसमोर २०३ धावांचं (Asian Games 2023) आव्हान दिलं होत. तर नेपाळने २० षटकांमध्ये ९ बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची भारताची संधी हुकली. नेपाळच्या अफिफ शेख (१०), कुशल भुर्तेल (२८), कुशल मल्ला (२९) आणि रोहित पुडेल हे ठराविक अंतराने बाद झाल्याने ११ व्या षटकात नेपाळची अवस्था ४ बाद ७७ अशी झाली होती. मीपेंद्र सिंह (३२) आणि संदीप जोरा (२९) यांनी पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची आक्रमक खेळी करत सामन्यात रंगत आणली.
(हेही वाचा – CM Yogi statement on Sanatan : जगात सनातन हा एकच धर्म; योगी आदित्यनाथ यांचे हिंदुत्वावर मोठे वक्तव्य)
भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई स्पर्धेत (Asian Games 2023) सुवर्ण पदक जिकल्यानंतर आता पुरुष संघानेही सुवर्ण पदकावर आपलं नाव करावं अशीच सर्व क्रिक्रेट चाहत्यांची इच्छा आहे. या एशियन गेममध्ये पुरुष क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आली आहे. ऋतुराज प्रथमच संघाच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी देखील ही स्पर्धा अतिशय महत्वाची आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community