Asian Games 2023 : सहाव्या दिवसाची सुवर्ण पदक जिंकून सुरुवात; भारताची एकूण २७ पदकांची कमाई

122
Asian Games 2023 : सहाव्या दिवसाची सुवर्ण पदक जिंकून सुरुवात; भारताची एकूण २७ पदकांची कमाई

होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळांचा (Asian Games 2023) आज म्हणजेच शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी सहावा दिवस आहे. अशातच आज दिवसाच्या सुरुवातीलाच ५० मीटर रायफल स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळालं आहे. भारताचं हे सातवं सुवर्णपदक आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि ११ कांस्य अशी एकूण २७ पदकं आहेत.

अधिक माहितीनुसार, आशियाई क्रीडा (Asian Games 2023) स्पर्धेत ऐश्वर्या प्रताप सिंग, स्वप्नील आणि अखिल या तिघांनी शूटिंगमध्ये कमाल केली आहे. तिघांनी मिळून ५० मीटर रायफल ३ पोझिशन पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या तिघांनी १७६९ स्कोर केला. तसेच ईशा सिंग, पलक आणि दिव्या टीएस या तिघींनी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

भारतीय संघ चीनपेक्षा ५ गुणांनी मागे राहिला आणि त्यांना रौप्यपदकावर (Asian Games 2023) समाधान मानावे लागले. ईशाचे हे हँगझोऊ गेम्समधील तिसरे पदक आहे. ईशा आणि पलक यांनीही वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांचा संघ १७३१-५० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चीनच्या रँक्सिंग, ली आणि नान या जोडीने सुवर्ण पटकावले आहे.

(हेही वाचा – Asian Games 2023 : जाणून घ्या २९ सप्टेंबरचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक)

अशातच आजपासून (Asian Games 2023) ॲथलेटिक्सच्या विविध क्रीडाप्रकारांच्या प्राथमिक स्पर्धा सुरू होत आहेत. त्या स्पर्धांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

ॲथलेटिक्स स्पर्धा

पहाटे ४ वाजून ३० मिनिटं – संदीप कुमार, (Asian Games 2023) विकास सिंग यांची २० किमी चालण्याची स्पर्धा अंतिम फेरी

पहाटे ४ वाजून ४० मिनिटं – प्रियंका २० किमी चालण्याची अंतिम फेरी

दुपारी ४ वाजून ३० मिनिटं – ऐश्वर्या मिश्रा – महिलांची ४०० मीटर धावण्याची शर्यत (हिट १)

दुपारी ४ वाजून ४० मिनिटं – रचना कुमारी, तान्या चौधरी – महिलांची हातोडा फेक अंतिम फेरी

दुपारी ४ वाजून ४६ मिनिटं – हिमांशी मलिक – महिलांची ४०० मीटर धावण्याची शर्यत (हिट ३)

दुपारी ४ वाजून ५५ मिनिटं – महम्मद अनस याहिया – पुरुषांची ४०० मीटर (हिट १)

संध्याकाळी ५ वाजून ३ मिनिटं – महम्मद अजमल – ४०० मीटर धावण्याची शर्यत (हिट २)

संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटं – किरण बलियन, मनप्रीत कौर – महिलांची शॉटपुट अंतिम फेरी

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.