होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळांचा (Asian Games 2023) आज म्हणजेच सोमवार २ ऑक्टोबर हा नववा दिवस आहे. अशातच आज दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने दोन पदकं पटकावली आहेत. देशाने रोलर स्केटिंग या क्रीडा प्रकारात दोन पदकं जिंकली आहेत.
अधिक माहितीनुसार, भारताने ही दोन पदकं (Asian Games 2023) महिलांच्या ३०० मीटर स्पीड स्केटिंग आणि पुरुषांच्या ३ हजार मीटर स्पीड स्केटिंगमध्ये जिंकली आहेत.
(हेही वाचा – Monsoon Update : देशात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; ‘या’ भागात जोरदार पावसाचा अंदाज)
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (Asian Games 2023) नवव्या दिवशी संजना, कार्तिका, हीरल आणि आरती यांच्या टीमने भारताला पहिले पदक मिळवून दिले. भारतीय महिला संघ कांस्यपदक पटकावले तर काही वेळानंतर पुरुष संघाने देखील केवळ ४ मिनिटे १०.१२९८ सेकंदांमध्ये हे कांस्य पदक पटकावले आहे.
भारताच्या (Asian Games 2023) खात्यात आतापर्यंत १३ सुवर्ण, २१ रौप्य आणि २१ कांस्य अशी एकूण ५५ पदकं आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community