चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने १०० पदकांचा टप्पा गाठला आहे. शनिवारी (७ सप्टेंबर) भारताच्या महिला कबड्डी टीमने गोल्ड मेडल जिंकले. तर गोल्ड मेडल्सची संख्या२५ झाली आहे. Asian Games 2023
भारताच्या महिला कबड्डी टीमने अंतिम सामन्यात तैवानला २६-२५ अशा फरकाने हरवलं. तैवानसोबत होत असलेल्या सामन्यात हाफ टाईमपर्यंत भारतीय टीम १४-९ ने आघाडीवर होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तैवानने जोरदार मुसंडी मारली. अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला.
भारताकडे किती पदके?
सुवर्ण : २५
रौप्य: ३५
कांस्य: ४०
एकूण: १००
२०१८ च्या आशियाई खेळांमध्ये, भारतीय संघाने ५७० सदस्यांच्या मजबूत तुकडीतून ७० पदके मिळवून आशियाई खेळांमध्ये सर्वाधिक पदकांचा विक्रम प्रस्थापित केला. आता या आवृत्तीत भारतीय संघाने आपली मागील सर्वोत्तम कामगिरी मागे टाकली आहे. आता भारतासमोर १०० हून अधिक पदके जिंकण्याचे लक्ष्य गाठण्याचे आव्हान आहे. महिला नेमबाजी संघाने २४सप्टेंबर रोजी हांगझोऊ येथे भारताचे पदकाचे खाते उघडले होते.
(हेही वाचा : ICC Cricket World Cup : ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या सामन्यात जिंकू शकेल का भारतीय क्रिकेट टीम?)
महिला संघ पहिल्यापासूनच आघाडीवर
आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डीमध्ये भारत आणि चायनीज तैपेई यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याबद्दल सांगायचे तर हा सामना खूपच रोमांचक होता. उभय संघांमधील सामना अत्यंत चुरशीने रंगला. जिथे कधी भारत तर कधी चायनीज तैपेई संघ आघाडी घेत होता. भारताने या सामन्याची जोरदार सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण त्यानंतर भारतीय महिला संघाने बचावात आघाडी गमावली. पूर्वार्धानंतर भारतीय महिला संघ १४-९ ने आघाडीवर होता.
हेही पहा –