Asian Games 2023 : भारताचे एक पदक निश्चित; बांगलादेशचा पराभव करत भारतीय महिला संघ अंतिम फेरीत दाखल

140
Asian Games 2023 : भारताचे एक पदक निश्चित; बांगलादेशचा पराभव करत भारतीय महिला संघ अंतिम फेरीत दाखल

चीनच्या हांगझू या शहरात यावर्षीची म्हणजेच १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2023) आयोजित करण्यात आली आहे. नुकताच या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा झाला. या स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसच्या पुरुष संघाने विजयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाकडून देखील एक पदक निश्चित झाले आहे. बांगलादेशचा पराभव करत भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताच्या गोलंदाजंनी (Asian Games 2023) बांगलादेशला अवघ्या ५१ धावांत रोखले. तर हे आव्हान भारताने केवळ आठ विकेट आणि १२ षटके राखून सहज पार केले.

(हेही वाचा – Asian Games 2023 : लव्हलिना व हरमनप्रीतने केले भारतीय तुकडीचे नेतृत्व)

असा रंगला सामना

बांगलादेशच्या विरुद्ध खेळतांना भारताने दमदार (Asian Games 2023) सुरुवात केली. कर्णधार स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी वादळी सुरुवात केली. अशातच १९ धावांवर पहिली विकेट पडली. कर्णधार स्मृती मंधाना सात धावांवर बाद झाली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि जेमिमा यांनी भाराताचा डाव सावरला. पण त्याचवेळी शेफाली वर्मा १६ धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमाने भारताला विजय मिळवून दिला. जेमिमान नाबाद २० धावांची खेळी केली.

नॉकआऊट सामन्यात बांगलादेशची कर्णधार नगर सुल्ताना हिने (Asian Games 2023) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. बांगलादेशचा संपूर्ण संघ १७.५ षटकात अवघ्या ५१ धावांत तंबूत परतला. कर्णधार सुल्ताना वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.