Asian Games 2023 : २६ सप्टेंबरचं भारतीय संघाचं पूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

२६ सप्टेंबरला भारतीय संघाला नेमबाजीतूनच पदकांची अपेक्षा आहे. भारतीय खेळाडूंचं वेळापत्रक जाणून घेऊया… 

162
Asian Games 2023 : २६ सप्टेंबरचं भारतीय संघाचं पूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
Asian Games 2023 : २६ सप्टेंबरचं भारतीय संघाचं पूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

ऋजुता लुकतुके

होआंगझाओ आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) तिसऱ्या दिवशी (२६ सप्टेंबर) भारताला पदकांची आशा असेल ती नेमबाजीतूनच. शिवाय पुरुषांचा हॉकी संघ अ गटातील आपला साखळी सामना खेळेल. भारतीय खेळाडूंचे मंगळवारचे सामने कधी आणि कुठे आहेत सविस्तर समजून घेऊया, (Asian Games 2023)

घोडेसवारी 

सकाळी ५ वाजून ३० मिनिटं – ह्रिदय छेडा, अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, दिव्यक्रीत सिंग सांघिक स्पर्धेची अंतिम फेरी, वैयक्तिक पात्रता स्पर्धा

नेमबाजी 

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – दिव्यांश सिंग पनवर व रमिता – १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता फेरी अनंतजीत सिंग नरुका, गुरज्योत सिंग खांगोरा, अंगद वीरसिंग बाजवा – स्कीट ७५ पुरुषांची वैयक्तिक फेरी गनेमत शेखॉन, दर्शना राठोड, परिनाझ धालिवाल – स्कीट ७५ महिलांची वैयक्तिक फेरी पात्रता स्पर्धा (७५ लक्ष्यभेद) स्कीट ७५ महिलांची सांघिक स्पर्धा

रिधम सांगवान, ईशा सिंग व मनू भाकेर – २५ मीटर पिस्तुल महिलांची सांघिक स्पर्धा रिधम सांगवान, ईशा सिंग व मनू भाकेर – २५ मीटर पिस्तुल महिलांची वैयक्तिक पात्रता स्पर्धा

हॉकी 

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – भारत वि. सिंगापूर पुरुषांची अ गटातील साखळी स्पर्धा

जलतरण 

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – शिवांगी सार्मा महिलांची १०० मीटर फ्रीस्टाईल (हिट ४) पलक जोशी महिलांची २०० मीटर बॅकस्ट्रोक (हिट २)

तलवारबाजी 

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – भवानी देवी वि. ज्युलिएट जी मिन हेंग (सिंगापूर) महिलांची वैयक्तिक साखळी स्पर्धा
अलहामद अलहस्ना अब्दुलरेहमान (सौदी अरेबिया) वि. भवानी देवी, महिलांची वैयक्तिक साखळी स्पर्धा
करीना डोसपे (कझाकिस्तान) वि. भवानी देवी, महिलांची वैयक्तिक साखळी स्पर्धा
झेनब दायीबेकोव्हा (उझबेकिस्तान) वि. भवानी देवी, महिलांची वैयक्तिक साखळी स्पर्धा
रुकसाना खातुन (बांगलादेश) वि. भवानी देवी, महिलांची वैयक्तिक साखळी स्पर्धा

ई-स्पोर्ट्स 

सकाळी ७ वाजून २० मिनिटं – तलत फौद टी राजिखान (सौदी अरेबिया) वि. मयांक प्रजापती, स्ट्रीट फायटर प्रकारातील अंतिम ३२ जणांची फेरी
अयान बिसवास वि खान हुंग चाऊ नियेन (व्हिएतनाम), स्ट्रीट फायटर प्रकारातील अंतिम ३२ जणांची फेरी

लॉन टेनिस 

सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – अंकिता रैना वि. अतिथ्या पताली  करुणारत्ने (श्रीलंका), महिलांची अंतिम १६ जणांची फेरी
रामकुमार रामनाथन वि. योसुके वातानुकी (जपान), पुरुषांची वैयक्तिक अंतिम १६ जणांची फेरी

ट्रॅक सायकलिंग 

सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – त्रियशा पॉल, मयुरी लुटे, सेलेस्टिना – महिलांची पात्रता फेरी
रोजीत सिंग, डेव्हिड बेकम, रोनाल्डो सिंग, ईसॉ आलबेन – पुरुषांची पात्रता फेरी
विश्वजीत सिंग, मनजीत कुमार, नीरज कुमार, वेंकप्पा शिवप्पा, दिनेश कुमार – पुरुषांची सांघिक फेरी
दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – रोजीत सिंग, डेव्हिड बेकम, रोनाल्डो सिंग, इसॉ आलबेन – पुरुषांची सांघिक स्पर्धा पहिली फेरी
रोजीत सिंग, डेव्हिड बेकम, रोनाल्डो सिंग, इसॉ आलबेन – पुरुषांची सांघिक स्पर्धा अंतिम फेरी

ज्युदो 

सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – इंदूबाला देवी वि. इकुमी ओडिया (थायलंड) – महिलांचा ७८ किलो वजनी गट, बाद फेरी
ट्युलिका मान वि. लाम किंग लाय (मकाऊ) – महिलांचा ७८ किलो वजनी गट, बाद फेरी
अवतार सिंग वि. किटीपाँग हनत्रातिन (थायलंड) – पुरुषांचा १०० किलो गट, अंतिम १६ जणांची फेरी

स्कॉश 

सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – भारत वि. सिंगापूर पुरुषांची सांघिक फेरी
भारत वि. पाकिस्तान – महिलांची सांघिक फेरी
दुपारी ४ वाजून ३० मिनिटं – भारत वि. कतार पुरुषांचा अ गट साखळी सामना

सेलिंग 

सकाळी ८ वाजून ३० मिनिटं – कोंगारा प्रीथी व सुधांशू शेखर – मिश्र ४७०, आर ११, १२
जेरोम कुमार – iQFoil – पुरुषांच्या आर १५ ते १९
नेहा ठाकूर – ILCA४, आर ११
सी डोईफोडे व राम्या सर्वानन – मिश्र Nacra१७, आर १३ व १४
सकाळी ८ वाजून ४० मिनिटं – अद्वैत प्रशांत मेनन – ILCA4, आर ११
सकाळी ११ वाजून ३० मिनिटं – नेत्रा कुमानन – ILCA6 आर १० व ११
हर्षिता तोमर व शीतल वर्मा – ४९ एफएक्स महिलांची आर १३, १४
ईश्वरिया गणेश – आरएस महिला आर १३, १४
सकाळी ११ वाजून ४० मिनिटं – विष्णू सर्वानन – ILCA7 आर १०, ११
केसी गणपथी व वरुण ठक्कर – पुरुषांची आर १३, १४
इबाद अली – आरएस महिला आर १३, १४

(हेही वाचा-Benefits of Bitter gourd : फक्त मधुमेहावरच नियंत्रण नाही तर ‘या फायद्यासाठीही’ कारली खा)

लॉन टेनिस 

सकाळी ९ वाजता – ऋतुजा भोसले वि. ॲलेक्स ईला (फिलिपीन्स) – महिलांची वैयक्तिक स्पर्धा
सकाळी १० वाजता – अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे वि. अंचिसा चांता व पुनिन कोविपितूकेड (थायलंड) अंतिम १६ जणांची फेरी
सुमित नागल वि. बिबिट जुकायेव (कझाकिस्तान) – पुरुषांची वैयक्तिक अंतिम १६ जणांची फेरी
ऋतुजा भोसले व करनम थंडी वि. यी हाँग वाँग व याँग युडिस चाँग (हाँग काँग) – महिला दुहेरीची अंतिम १६ जणांची फेरी
दुपारी १ वाजून ३० मिनिटं – युकी भांबरी व अंकिता रैना वि. अकील खान व सारा इब्राहिम (पाकिस्तान) – मिश्र दुहेरीची अंतिम ३२ जणांची फेरी

जलतरण 

सकाळी ९ वाजून ५ मिनिटं – साजन प्रकाश, श्रीहरी नटराज, लिखित प्रेमा सेल्वराज, तनिश जॉर्ज मॅथ्यू – पुरुषांची १०० मीटर मिडले स्पर्धा

मुष्टीयुद्ध 

दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – असरी उदिन (इंडोनेशिया) वि. सचिन – पुरुषांची ५१ ते ५७ किलो वजनी गटातील प्राथमिक फेरी
संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटं – नरिंदर वि. ओमाटबेक एलचोरो – पुरुषांची ९२ किलो वजनी गटातील अंतिम १६ जणांची स्पर्धा

बुद्धिबळ 

दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – कोनेरु हंपी व द्रोनावेली हरिका – महिलांची वैयक्तिक स्पर्धा पाचवी फेरी
विदिथ गुजराती व अर्जुन कुमार पुरुषांची वैयक्तिक स्पर्धा पाचवी फेरी
दुपारी २ वाजून ३० मिनिटं – कोनेरू हंपी व द्रोनावेली हरिका – महिलांची वैयक्तिक सहावी फेरी
विदिथ गुजराती व अर्जुन कुमार पुरुषांची वैयक्तिक स्पर्धा सहावी फेरी
दुपारी ४ वाजून ३० मिनिटं – कोनेरु हंपी व द्रोनावेली हरिका – महिलांची वैयक्तिक स्पर्धा सातवी फेरी
विदिथ गुजराती व अर्जुन कुमार पुरुषांची वैयक्तिक स्पर्धा सातवी फेरी

व्हॉलीबॉल 

दुपारी ४ वाजता – भारत वि. पाकिस्तान पुरुषांची पाचव्या व सहाव्या स्थानासाठीचा सामना

वुशू 

संध्याकाळी ५ वाजता – सूर्या भानू प्रताप सिंग व सांदा – पुरुषांचा ६० किलो वजनी गट उपउपान्त्य फेरी
एम खालिद होतक (अफगाणिस्तान) वि. सुरज यादव – पुरुषांचा ७० किलो वजनी गटातील उपउपान्त्य फेरीतील सामना

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.