ऋजुता लुकतुके
सोमवार म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी भारताला या आशियाई क्रीडास्पर्धांमधील (Asian Games 2023) पहिलं सुवर्ण पदक जिंकण्याची संधी आहे. कर्णधार स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तिथे त्यांची लढत श्रीलंकेशी होणार आहे. होआंगझाओच्या पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय महिलांनी पहिल्या फेरीत बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.
क्रिकेट व्यतिरिक्त नेमबाजी आणि रोइंग प्रकारातही भारताला (Asian Games 2023) पदकाची आशा आहे. हे अंतिम सामनेही आज (सोमवार २५ सप्टेंबर) होणार आहेत. तेव्हा आधी पाहूया भारतीय संघाचे सामने कुठे आणि किती वाजता होणार आहेत?
आशियाई क्रीडास्पर्धा २०२३ चं लाईव्ह प्रक्षेपण कधी सुरू होणार?
२५ सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेचे (Asian Games 2023) सामने भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता (6:30 IST) सुरू झाले आहेत.
(हेही वाचा – Women’s Reservation : महिला आरक्षणामुळे राजकारणातील घराणेशाहीला अंकुश!)
आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे सुरू आहेत?
२५ तारखेचे सर्व सामने चीनमध्ये होआंगझाओ (Asian Games 2023) इथं विविध मैदानांवर सुरू आहेत.
भारतात आशियाई स्पर्धांचं प्रक्षेपण कुठे सुरू आहे?
आशियाई क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रिमिंग (Asian Games 2023) सोनी लिव्ह या वाहिनीवर तसंच ओटीटी ॲपवर आणि सोनीच्या वेबसाईटवर सुरू आहे. ॲपवर तसंच ओटीटीवर तुम्ही हवा असलेला खेळही निवडू शकाल.
टीव्हीवर आशियाई स्पर्धा कशा पाहता येतील?
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (Asian Games 2023) थेट प्रसारणाचे हक्कही सोनी वाहिनीकडेच आहेत. सोनी स्पोर्ट्स टेन टू (एसडी), सोनी स्पोर्ट्स टेन टू (एचडी) या वाहिन्यांवर इंग्रजीत तर सोनी स्पोर्ट्स टेन थ्री (एसडी) आणि सोनी स्पोर्ट्स टेन थ्री (एचडी) या वाहिन्यांवर हिंदी समालोचन पाहता आणि ऐकता येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community