ऋजुता लुकतुके
टी-२० क्रिकेट वेगवान आहे आणि २० षटकांतच इथं २००-२५० धावा होतात, हे सगळ्यांना माहीत आहे. (Asian Games 2023) चीनमध्ये सुरू असलेल्या होआंगझाओ आशियाई खेळात एका संघाने निर्धारित २० षटकांमध्ये चक्क ३०० चा टप्पा गाठला आहे. हा संघ आहे नेपाळचा. मंगोलियाच्या गोलंदाजीची पिसं काढत त्यांनी ३ बाद ३१४ अशी धावसंख्या रचली.
(हेही वाचा – Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पुढील देखभालीसाठी होणार ३१५ कोटी रुपयांचा खर्च)
टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हा नवा विक्रम आहे.
यापूर्वी आयसीसीच्या एका पात्रता स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने आयर्लंड विरुद्ध ३ बाद २७८ धावा केल्या होत्या. (Asian Games 2023) नेपाळच्या सर्वच फलंदाजांनी सुरुवातीपासून बेडर फलंदाजीचा दृष्टिकोन ठेवला होता. त्यातही त्यांचा स्टार फलंदाज दिपेंद्र सिंग ऐरी उजवा ठरला. त्याने अर्धशतक झळकावले ते फक्त ९ चेंडूत. ते करताना सर्वात जलद अर्धशतकाचा युवराज सिंगचा विक्रमही त्याने मोडित काढला.
आणखी एक नेपाळी फलंदाज कुशाल मल्लाने ३४ चेंडूंमध्ये शतक ठोकलं. त्यामुळे रोहीत शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर यांच्या नावावर ३५ चेंडूंमध्ये जलद शतकासाठी असलेला विक्रमही मोडीत निघाला. (Asian Games 2023)
🏆 Match Day 01 🇳🇵🇲🇳 🏏
Kushal Malla on fire as he gets his century 🔥#weCAN #AsianGames pic.twitter.com/dmzfLeLX5y— CAN (@CricketNep) September 27, 2023
मल्लाने ५० चेंडूत १३४ नाबाद धावा केल्या, त्या १२ षटकार आणि ८ चौकारांच्या सहाय्याने. त्याच्या मागून आलेल्या दिपेंद्रने डावाच्या शेवटी फटकेबाजी करत १० चेंडूत ५२ धावा फटकावल्या. दिपेंद्रच्या नावावर आणखी एक विक्रम लागला. त्याचा स्ट्राईक रेट ५२० इतका आहे. हा एक विक्रम असेल.
दिपेंद्रने खेळलेल्या १० चेंडूंपैकी आठ तर षटकार होते!
त्यानंतर नेपाळने मंगोलियाला ४१ धावांमध्ये गुंडाळलंही. त्यामुळे टी-२० तसंच क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठा विजयही नेपाळने साकारला. मंगोलियाला त्यांनी २७३ धावांनी हरवलं.
अशाप्रकारे, नेपाळ आणि मंगोलिया विरुद्धचा हा सामना इथं झालेल्या विक्रमांसाठीच लक्षात राहील. विक्रमही दीर्घकाळ टिकतील असे आहेत. (Asian Games 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community